बिल गेट्स यांनी शेअर केला त्यांचा 48 वर्ष जुना Resume, नोकरी शोधणाऱ्यांना दिला खास संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 11:15 AM2022-07-02T11:15:28+5:302022-07-02T11:57:16+5:30

Bill Gates Resume : नोकरी मिळवण्यासाठी रिज्यूम असा हवा की, तुमची योग्यता, अनुभव आणि कौशल्य चांगल्याप्रकारे दाखवू शकाल. रिज्यूम, हायरिंगसाठी सर्वात महत्वपूर्ण मानला जातो.

Microsoft co founder Bill Gates shares his 48 year old resume | बिल गेट्स यांनी शेअर केला त्यांचा 48 वर्ष जुना Resume, नोकरी शोधणाऱ्यांना दिला खास संदेश

बिल गेट्स यांनी शेअर केला त्यांचा 48 वर्ष जुना Resume, नोकरी शोधणाऱ्यांना दिला खास संदेश

Next

Bill Gates Resume : मायक्रोसॉफ्टचे को-फाउंडर बिल गेट्स यांना कुणी ओळखत नाही असं क्वचितच कुणी असेल. जगतील लाखो लोकांसाठी ते प्रेरणा आहेत. बिल गेट्स यांनी मिळवलेल्या यशाने हे दिसलं की, मनुष्यांची स्वप्न खरी ठरतात. फक्त गरज असते ती कठोर मेहनत आणि संयमाची. सध्या बिल गेट्स यांचा रिज्यूम चांगलाच चर्चेत आहे. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, नोकरी शोधणाऱ्या व्यक्तीसाठी रिज्यूम किती महत्वाचा आहे. 

नोकरी मिळवण्यासाठी रिज्यूम असा हवा की, तुमची योग्यता, अनुभव आणि कौशल्य चांगल्याप्रकारे दाखवू शकाल. रिज्यूम, हायरिंगसाठी सर्वात महत्वपूर्ण मानला जातो. जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक बिल गेट्स यांनी नुकताच त्यांचा 48 वर्षाआधीचा रिज्यूम शेअर केला आहे. त्यांनी शेअर करत सांगितलं की, त्यांना विश्वास आहे की,  आजचा रिज्यूम त्यांच्यापेक्षा चांगला आहे.

Resume बघण्यासाठी इथे क्लिक करा.

गेट्स यांनी शेअर केलेल्या 1974 मधील रिज्यूममध्ये त्यांचं नाव विलियम एच गेट्स आहे. हा तेव्हाचा आहे जेव्हा ते हॉर्वर्ड कॉलेजमध्ये फर्स्ट इअरचं शिक्षण घेत होते. बिल गेट्स यांनी त्यांच्या रिज्यूममध्ये मेंशन केलं की, त्यांनी ऑपरेटींग सिस्टीम स्ट्रक्चर, डेटाबेस, मॅनेजमेंट, कंपाइलर कन्स्ट्रक्शन आणि कॉम्प्युटर ग्राफिक्ससारखे कोर्स केले. रिज्यूममध्ये लिहिलं आहे की, त्यांनी FORTRAN, COBOL, ALGOL, BASIC, इत्यादी लॅंग्वेजचा अनुभव आहे.

त्यांनी 1973 मध्ये टीआरडब्ल्यू सिस्टम ग्रुपसोबत सिस्टीम प्रोग्रामर म्हणून काम केलं. बिल गेट्स यांनी 1972 मध्ये लेकसाइड स्कूल, सिएटलमध्ये कॉन्ट्रॅक्टवर को-लीडर आणि को-पार्टनर म्हणून काम केलं. लोक त्यांच्या या रिज्यूमवर भरभरून कमेंट्स करत आहेत. 

Web Title: Microsoft co founder Bill Gates shares his 48 year old resume

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.