'हा' कपलचा फोटो रेल्वे मंत्रायलाने केला ट्विट, यावर लोकांनी केलेल्या कमेंट्स वाचाल तर पोट धरून हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 03:35 PM2019-08-29T15:35:07+5:302019-08-29T15:41:07+5:30

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, एक प्रेमी युगुल रेल्वे ट्रॅकवर उभी असलेल्या मालगाडीखाली बसलेलं आहे.

Ministry of Railways trolled after posting of viral picture of couple | 'हा' कपलचा फोटो रेल्वे मंत्रायलाने केला ट्विट, यावर लोकांनी केलेल्या कमेंट्स वाचाल तर पोट धरून हसाल!

'हा' कपलचा फोटो रेल्वे मंत्रायलाने केला ट्विट, यावर लोकांनी केलेल्या कमेंट्स वाचाल तर पोट धरून हसाल!

Next

सोशल मीडियात सतत काहीना काही व्हायरल होत राहतं. जे पाहून कधी लोक हसतात तर कधी त्यांना धक्काही बसतो. असाच एक फोटो काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, एक प्रेमी युगुल रेल्वे ट्रॅकवर उभी असलेल्या मालगाडीखाली बसलेलं आहे. हा फोटो कुणीतरी काढला आणि सोशल मीडियात शेअर केला.

तुमच्या-आमच्यासोबतच हा फोटो रेल्वे मंत्रालयापर्यंत पोहोचला. मंत्रायलाने हा फोटो ट्विट केला आणि लोकांच्या चांगल्यासाठी सांगितलं की, हे धोकादायक आणि दंडात्मक गुन्हा आहे. कृपया असे रेल्वेच्या डब्याखाली किंवा कोचखाली बसू नका. कारण गाडी कधीही कोणत्याही सुचनेशिवाय पुढे जाऊ शकते. रेल्वे ट्रॅकही योग्यप्रकारे क्रॉस करा, सुरक्षित रहा.

रेल्वे मंत्रायलाने केलेल्या ट्विटवर नंतर लोकांनी चिमटे काढायला सरूवात केली. काही यूजर्सने तर ट्विटवर गंमत करत लिहिले की, मोदींच्या राज्यात कुणीही एकमेकांशी प्रेम करू शकत नाही. तर काही लोकांनी लिहिले की, स्वत:साठी नाही तर निदान प्रेमी युगुलांसाठी तरी झाडे लावा.

तसेच एका यूजने ट्विट केलं की, आता काय मोदींच्या सत्तेत लोक प्रेमही करू शकणार नाही. बागेत बसलं तर पोलिसांची भीती, प्लॅटफॉर्मवर नातेवाईकांची भीती, रेल्वे ट्रॅकवर बसू देत नाहीत. करायचं तर काय करायचं?

आणखीही काही यूजर्सने लिहिले की, या दोघांना कुणी सरकारकडे शिफारस करून पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून द्या. एका यूजरने लिहिले की, सर, ते जे काम करत आहेत. त्यानंतर ते आनंदाने तुरूंगात जातील.

Web Title: Ministry of Railways trolled after posting of viral picture of couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.