ऐकावं ते नवलच! लपाछपी खेळण्यासाठी लपायला गेला अन् थेट दुसऱ्या देशात पोहोचला; वाचा नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 04:52 PM2023-01-29T16:52:36+5:302023-01-29T16:52:56+5:30

आपल्याकडे लहान मुल लपाछपी हमखास खेळतात. लपाछपी खेळत असताना मुलं कुठही लपत असतात.

minor boy reached another country playing hide and seek | ऐकावं ते नवलच! लपाछपी खेळण्यासाठी लपायला गेला अन् थेट दुसऱ्या देशात पोहोचला; वाचा नेमकं काय घडलं

ऐकावं ते नवलच! लपाछपी खेळण्यासाठी लपायला गेला अन् थेट दुसऱ्या देशात पोहोचला; वाचा नेमकं काय घडलं

Next

आपल्याकडे लहान मुल लपाछपी हमखास खेळतात. लपाछपी खेळत असताना मुलं कुठही लपत असतात.  हॉलिवूडचा चित्रपट 'नार्निया' यात लहान मुल लपाछपी खेळता-खेळता एका अलमारीत लपतात, यानंतर ती मुल दुसऱ्या देशात पोहोचतात, अशीच एक घटना समोर आली आहे. लपाछपी खेळत एक 15 वर्षांचा मुलगा दुसऱ्या देशात पोहोचला आणि एका आठवड्यानंतर त्याचा शोध लागल्याचे समोर आले आहे. 

ही घटना बांगलादेश मधील आहे. फहीम त्याच्या मित्रांसोबत चितगाव बंदरावर लपाछपी खेळत होता. यावेळी तो एका कंटेनरमध्ये लपला होता. यानंतर कंटेनर तिथे असणाऱ्या लोकांनी तो कंटेनर जहाजामध्ये भरला. हे जहाज मलेशियाला जात होते. 11 जानेवारीला कंटेनरमध्ये लपलेला मुलगा 17 जानेवारीला सापडला.

मलेशियाचे गृहमंत्री दातुक सेरी सैफुद्दीन यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. ' ज्यावेळी मुलाला  कंटेनरमधून खाली उतरला तेव्हा तो मलेशियामध्ये होता. यावेळी त्याची प्रकृती खराब होती. भूक आणि तहान यामुळे तो बेशुद्ध पडला होता. या कंटेनरमधून त्याने तब्बल 2300 मैल अंतर कापले आहे. तो मुला खेळादरम्यानच कंटेनरमध्ये लपला होता, त्यातून तो मलेशियामध्ये पोहोचला, असंही सैफुद्दीन म्हणाले.

पोलिसांनी सुरुवातीला या मुलावर संशय व्यक्त केला होता. हे मानवी तस्करीचे प्रकरण असल्याचे पोलिसांनी म्हटले होते. ऑक्टोबरमध्येही अशीच एक घटना घडली होती, पण, मुलांचा मृत्यू झाला होता. चितगावहून मलेशियातील पेनांगला जाणाऱ्या कंटेनरमध्ये तो अडकला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह सापडला होता.

Web Title: minor boy reached another country playing hide and seek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.