एअरहॉस्टेससोबत केले गैरवर्तन, क्रु मेंबर्सनी शिकवला असा धडा की, पुन्हा हिम्मत करणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 07:02 PM2021-08-04T19:02:10+5:302021-08-04T19:02:51+5:30
विमानामध्ये एअरहॉस्टेससोबत गैरवर्तन होण्याचे अनेक प्रकार होतात. पण एका तरुणाला एअर हॉस्टेसोबत गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडलेय. त्याला असा काही धडा शिकवण्यात आला की तो पुन्हा असे करण्याची हिम्मत करणार नाही.
विमानामध्ये एअरहॉस्टेससोबत गैरवर्तन होण्याचे अनेक प्रकार होतात. पण एका तरुणाला एअर हॉस्टेसोबत गैरवर्तन करणे चांगलेच महागात पडलेय. त्याला असा काही धडा शिकवण्यात आला की तो पुन्हा असे करण्याची हिम्मत करणार नाही.
अमेरिकेतील फ्रंटियर एअलाईन्समधील विमानात ही घटना घडली. हे विमान मियामीला जात होतं. Maxwell Wilkinson Berry य़ा २२ वर्षीय युवकानं विमानातील एअरहॉस्टेसला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. त्यानंतर क्रु मेंबर्ससोबत झालेल्या वादात त्याने त्यांना शिविगाळ करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर तो मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावरही धावून गेला.
#frontier#frontierairlines crazy it happened right beside, me it’s crazy out here pic.twitter.com/YdjURlSb5p
— k9spams (@k9spams) August 3, 2021
क्रु मेंबर्सनी त्या युवकाला टेपच्या साहाय्याने बांधुन ठेवले. तसेच त्याचे तोंडही टेपने बंद केले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की तो ओरडतो आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो त्यावेळी दारुच्या नशेत होता.
This will forever be the most dehumanizing experience in my entire life. Many people laughed and ridiculed me as I was mistreated by staff of a PROFESSIONAL airline. Just to make matters worth this has gone “viral” on the internet and will never disappear. My life will never be https://t.co/ucf5YnnfJY
— max berry (@maxberry1998) August 4, 2021
यावर बेरीने अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. तो म्हणतोय की हा माझ्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक अनुभव आहे. विमानातील क्रु मेंबर्स माझ्यासोबत गैरवर्तन करत होते तेव्हा सर्वजण माझ्यावर हसत होते. अनेकजण माझी मजा घेत होते. हा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झालाय. त्यामुळे तो इंटरनेटवर कायमचा राहिल आणि हा दु:खदायक अनुभवही माझ्या आयुष्यातून पुसला जाणार नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत