७ महिन्यांपासून लांब होतं लेकरू; बापानं ३७ तास स्कूटर चालवून चिमुरड्यासाठी गाव गाठलं
By manali.bagul | Published: October 29, 2020 05:53 PM2020-10-29T17:53:28+5:302020-10-29T18:11:28+5:30
Inspirational Stories: सायन ते तामिळनाडूतील पुडूकोट्टईपर्यंतचा रस्ता त्यांनी स्कूटरवर पार केला आहे. सेल्वम हे मुंबईत आपलं किराणा दुकान चालवतात.
(Image Credit- New Indian Express)
मुलं कुठेही असली तरी आई, वडिलांना त्यांची काळजी असते. आपल्या मुलांना भेटण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. आज आम्ही तुम्हाला एका दाम्पत्याने आपल्या मुलाला भेटण्यासाठी केलेल्या प्रवासाबद्दल सांगणार आहोत. तब्बल १ हजार ४०० किलोमीटर स्कूटर चालवून या आई बाबांनी आपल्या चिमुरड्याला सरप्राईज दिलं आहे. मुंबईतील सायन येथिल रहिवासी असलेल्या सेल्वम आणि संगिता यांनी आपल्या मुलाला सरप्राईज देण्यासाठी असा प्लॅन केला होता. सायन ते तामिळनाडूतील पुडूकोट्टईपर्यंतचा रस्ता त्यांनी स्कूटरवर पार केला आहे. सेल्वम हे मुंबईत आपलं किराणा दुकान चालवतात.
न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार लग्नानंतर हे दाम्पत्य मुंबईत स्थाईक झाले. मार्चमध्ये मुलांना सुट्ट्यांचा आनंद घेता यावा यासाठी गावी आजी आजोबांकडे म्हणजेच पुडूकोट्टई इथे त्यांना आपल्या मुलांना काही दिवसांसाठी ठेवलं. लवकरच संगीता आणि सेल्वम आपल्या मुलांना मुंबईला परत आणण्यासाठी जाणार होते. पण त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले आणि सर्वकाही ठप्प होते. अशावेळी ६ वर्षाच्या चिमुरड्याला आपल्या गावच्या घरी राहण्याशिवाय आणि आई वडिलांना वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. Video : 'मास्क क्यू नही लगाते?' असं विचारल्यास पठ्ठ्याने जे उत्तर दिलं ऐकून पोट धरून हसाल...
७ महिन्यांपर्यंत आपल्या मुलांपासून लांब होते
संगीता यांनी सांगितले की, ''मी एक आठवडाही माझा मुलगा योगेश्वरपासून दूर राहिले नव्हते. लॉकडाऊनमुळे तब्बल सात महिने मला मुलापासून लांब राहावं लागलं. योगेश्वरचा ६ वा वाढदिवस जवळ येत होता. म्हणून आम्ही योगेश्वरला सरप्राईज द्यायचं ठरवलं. पण तिरूचीसाठी कोणतीही ट्रेन नव्हती. विमानाचे तिकिटंही महागडं, म्हणून आम्ही दोघांनी बाईकने पुडूकोट्टई जाण्याचं ठरवलं. Video: भारतातील रस्त्यांवर वावरताना दिसला रुबाबदार ब्लॅक पँथर, दुर्मिळ फोटो कॅमेरात कैद
तब्बल ३७ तासांचा प्रवास केला
१४०० किलोमीटरचा प्रवास करण्यासासाठी तब्बल ३७ तासांचा वेळ लागला. सेल्वम यांनी सांगितले की, ''आम्ही कोल्हापूरला १ दिवस आणि २ दिवस बँगलुरूला थांबलो. त्यानंतर स्कूटरची सर्विसिंगसुद्धा करून घेतली जेणेकरून प्रवासादरम्यान अडचण येणार नाही. प्रवासाच्या पहिल्या दिवशी आम्ही ३०० किलोमीटर, इतर दिवशी ८०० किलोमीटर नंतर ३९८ किलोमीटरचा रस्ता पार केला. हा प्रवास पूर्ण होण्यासाठी जवळपास ७ हजार रुपयांचा खर्च आला. मानलं गड्या! पार्ट टाईम जॉब म्हणून मास्तरानं सुरू केली शेती अन् आता घेतोय १ कोटींची कमाई