"आई प्रेग्नेंट आहे..." वडिलांचा एक फोन आला अन् २३ वर्षीय युवतीचं आयुष्य बदललं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 10:18 AM2023-03-16T10:18:02+5:302023-03-16T10:19:47+5:30
जेव्हा या मुलीला कळालं आई प्रेग्नेंट आहे तोपर्यंत ८ महिना सुरू झाला होता. स्वत:आईलाही सातव्या महिन्यात ती गर्भवती असल्याचं कळालं.
नवी दिल्ली - 'आई प्रेग्नेंट आहे...' वडिलांच्या त्या एका फोन कॉलमुळे २३ वर्षीय मुलीचं आयुष्य बदललं. तिची कहानी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी आई पुन्हा गर्भवती राहणे त्या मुलीसाठी हैराण करणारे होते. २३ व्या वर्षी कुणी आई वडील मुलांना असं कसं सांगू शकतील? Humans of Bombay ने इन्स्टाग्रामवर या मुलीची कहानी शेअर केली आहे.
जेव्हा या मुलीला कळालं आई प्रेग्नेंट आहे तोपर्यंत ८ महिना सुरू झाला होता. स्वत: आईलाही सातव्या महिन्यात ती गर्भवती असल्याचं कळालं. ही मुलगी सिंगल चाइल्ड होती तिला कुणीतरी जोडीदार हवा होता. आई वडिलांनी मुलीपासून लपवली बाब, पण का? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पोस्टमध्ये ती सांगते की, लहानपणी मी आईला म्हणायचे मला भाऊ पाहिजे. परंतु आई म्हणायची, तुझ्या जन्मानंतर काहीतरी शारिरीक समस्या झाली त्यामुळे पुन्हा ती गर्भवती राहू शकत नाही. त्यानंतर सर्वकाही सुरळीत सुरू होते.
त्यानंतर एकेदिवशी वडिलांचा कॉल आला, त्यांनी अम्मा प्रेग्नेंट आहे हे सांगितले. मी त्यावर काय रिएक्ट करू हेच कळालं नाही. काही दिवसांनी जेव्हा मी घरी गेले तेव्हा आईच्या कुशीत मी रडू लागले. मला या गोष्टीची लाज का वाटतेय? मला देखील हेच हवे होते असं मुलीने पोस्टमध्ये म्हटलं. आई वडील एकेदिवशी मंदिरात गेले होते तिथे आई अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला तातडीने डॉक्टरांकडे नेले तेव्हा आई गर्भवती असल्याचं समोर आले.
काही कारणास्तव बेबीबंप दिसत नव्हता. अम्माचे पीरिएड्स थांबले होते तेव्हा ते मेनोपॉज आहे असं तिला वाटलं. प्रेग्नेंसीची गोष्ट त्यांच्या मनातही आली नाही. हळू हळू ही बाब मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये पसरली तेव्हा अनेकजण हैराण झाले, काहींनी टोमणेही मारले. परंतु माझ्या कुटुंबाने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. आठवडाभराने आईने एका मुलीला जन्म दिला म्हणजे माझ्या बहिणीला जन्म दिला. विशेष म्हणजे ४० व्या वर्षानंतर गरोदर होण्याची शक्यता कमी होते पण अशक्य नाही. वाढत्या वयात गर्भधारणा राहणे त्याला एडवांस्ड मॅटरनल एज प्रेग्नेंसी म्हणतात. अलीकडच्या काळात ४० वयानंतर गर्भवती राहणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे.