सोमवारी ऑफिसला जायला इतका कंटाळा किंवा आळस का येतो? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 02:49 PM2024-09-16T14:49:48+5:302024-09-16T14:54:10+5:30

Monday Blues : सोमवारी ऑफिसला जाण्यावरून इतका का तणाव वाढतो किंवा आळस का येतो? यामागची कारणं आज आपण जाणून घेणार आहोत आणि यावरील उपायही जाणून घेणार आहोत. 

Monday blues reason and precaution, what is Sunday night syndrome | सोमवारी ऑफिसला जायला इतका कंटाळा किंवा आळस का येतो? जाणून घ्या यामागचं कारण...

सोमवारी ऑफिसला जायला इतका कंटाळा किंवा आळस का येतो? जाणून घ्या यामागचं कारण...

Monday Blues : शनिवार किंवा रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी ऑफिसला जाणं अनेकांसाठी तणावपूर्ण ठरत असतं. रविवारच्या रात्रीच ऑफिसला जाण्याची चिंता सुरू होते. ज्याला संडे नाइट सिंड्रोम असं म्हटलं जातं. अशात अनेकांना हा प्रश्न पडत असेल की, ऑफिसला तर रोज जावं लागतं, पण सोमवारी ऑफिसला जाण्यावरून इतका का तणाव वाढतो किंवा आळस का येतो? यामागची कारणं आज आपण जाणून घेणार आहोत आणि यावरील उपायही जाणून घेणार आहोत. 

मंडे ब्लूज

मंडे ब्लूज हा शब्द तुम्ही कधीना कधी ऐकला असेलच. काम किंवा शाळेच्या दिनचर्येमध्ये परत येणं कधी कधी काही लोकांसाठी कंटाळवाणं ठरतं. वीकडेजच्या सुरूवातीला ऑफिसचा तणाव अधिक जाणवतो. वीकेंड लोक आराम करतात आणि त्यांना हवे ती कामे करतात. त्यांच्यावर कोणताही दबाव किंवा बंधन नसतं. अशात सोमवारी पुन्हा त्याच दिनचर्येत परत येणं अवघड होतं.

सामान्यपणे सोमवारी ऑफिसमध्ये नवीन कामे आणि जबाबदाऱ्या मिळतात. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशीच व्यक्तीला जास्त दबाव आणि तणावाचा सामना करावा लागतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये मीटिंग आणि पूर्ण आठवड्याचा प्लान तयार करायचा असतो. याचं टेंशन रविवारच्या रात्रीपासूनच सुरू होतं. कारण वीकेंड संपलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ऑफिसला जायचं असतं. ऑफिसमधील नकारात्मक वातावरण, असंतोषजनक स्थिती आणि वैयक्तिक समस्या यांमुळे मंडे ब्लूजची स्थिती निर्माण होते. हे अशा लोकांसोबत जास्त होतं जे त्यांच्या मनासारखं काम करत नाहीत किंवा आपलं काम एन्जॉय करत नाहीत.

मेडिकल न्यूज टुडेनुसार, मंडे ब्लूज अशा लोकांना जास्त प्रभावित करतं ज्यांना ऑफिसमध्ये पाच दिवस काम केल्यावर दोन दिवसांची सुट्टी मिळते. एक्सपर्ट असा देतात की, नोकरीचा तणाव मंडे ब्लूजचं कारण होऊ शकत नाही. पण मंडे ब्लूज या गोष्टीला प्रभावित करतं की, व्यक्ती तणावाबाबत कशी प्रतिक्रिया देतं. एक्सपर्ट सांगतात की, मंडे ब्लूज असलेले लोक आठवड्याच्या सुरूवातील तणावाप्रती वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. आपल्या शेड्यूलवर नियंत्रण कमी असल्याने आठवड्याच्या सुरूवातीला आळस जाणवतो.

मंडे ब्लूजवर उपाय

फोर्ब्सनुसार, मंडे ब्लूजपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात आधी स्वत:ला विचारायला हवं की, तुम्हाला काय चुकीचं वाटत आहे. जर तुम्हाला जास्तीत जास्त आठवड्यांमध्ये मंडे ब्लूजची फीलिंग येत असेल, तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नये. हा तुम्ही कामाबाबत नाखूश आहात याचा एक महत्वाचा संकेत आहे आणि यावर उपाय म्हणून तुम्ही पुढे जाऊन दुसरी नोकरी शोधली पाहिजे.

फ्लेक्सजॉबचे सीईओ आणि संस्थापक सारा सटन फेल म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी काही गोष्टींची एक लिस्ट बनवली पाहिजे. त्यात त्यांनी त्यांना नोकरी कशामुळे निराश करत आहे हे लिहिलं पाहिजे. जर तुम्हाला मूळ अडचण समजली तर ती दूर करण्यास मदत मिळेल. त्यासोबतच अशा गोष्टींचीही लिस्ट बनवा ज्यामुळे तुम्हाला ऑफिसला जाण्याचं मन होतं. त्यानंतर तुम्हाला ज्यात जास्त आनंद मिळतो त्यावर लक्ष केंद्रीत करा.

सोमवारचा ऑफिसला जाण्याचा आळस किंवा तणाव दूर करण्यासाठी शुक्रवारी दुपारीपर्यंत स्वत:ला अधिक तयार करा. आठवड्याच्या शेवटी अशा कामांवर लक्ष केंद्रीत करा जे तुम्हाला कमी पसंत आहेत. याने तुम्ही सोमवारी कोणत्याही तणावाशिवाय दिवसाची सुरूवात कराल.

Web Title: Monday blues reason and precaution, what is Sunday night syndrome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.