VIDEO : जमिनीवर बसलेल्या चिमुकल्याला माकडाने घेतलं कुशीत, आई घ्यायला गेली तर करू लागला असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 04:28 PM2021-03-24T16:28:05+5:302021-03-24T16:40:47+5:30
इन्स्टाग्राम अकाउंटवर काही तासांपूर्वी झालेला व्हिडीओ लोकांना मनाचा ठाव घेत आहे. हा व्हिडीओ लोाकांना आवडण्यामागचं कारण म्हणजे मुलगा अजिबात न घाबरता तिथेच बसून आहे.
माकडाला जवळून पाहताना किंवा त्याच्या जवळ गेल्यावर तो आपल्या झडप तर नाही घेणार ना? तो हल्ला तर नाही करणार ना? अशी भीती प्रत्येकाला वाटली असेलच. मात्र, माकडाची निरागसता अनेकदा मन जिंकून जाते. असाच एक मन जिंकणारा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, एक माकड अचानक जमिनीवर बसलेल्या चिमुकल्याजवळ जातो आणि आपल्या कुशीत घेतो. माकडाने त्या मुलाला काहीही नुकसान पोहोचवलं नाही. बाजूलाच मुलाची आई सुद्धा उभी आहे.
इन्स्टाग्राम अकाउंटवर काही तासांपूर्वी झालेला व्हिडीओ लोकांना मनाचा ठाव घेत आहे. हा व्हिडीओ लोाकांना आवडण्यामागचं कारण म्हणजे मुलगा अजिबात न घाबरता तिथेच बसून आहे. आणि माकडानेही त्याला काहीही नुकसान पोहोचवलं नाही. इतकेच नाही तर जेव्हा मुलाला उचलण्याचा प्रयत्न करते तेव्हा माकड त्याला उचलू देत नाही. अशातही तो मुलगा शांतपणे माकडाजवळ बसून आहे. माकडाचं हे प्रेम पाहून लोक हैराण झाले आहेत. मनाला भिडणाऱ्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. (हे पण वाचा : VIDEO : आई-वडील करत होते लग्न, त्यांच्या मुलीने मधेच जे केलं ते पाहून सगळे झाले हैराण!)
सामान्यपणे काही लहान मुले कोणत्याही प्राण्याला बघून पळताना दिसतात. पण या व्हिडीओत बघायला मिळतं की, तो माकडाच्या या वागण्यावर काहीच रिअॅक्शन देत नाही. तो शांतपणे तिथे बसून आहे. त्यामुळेच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जनावरांप्रति मनुष्याचं प्रेम नेहमीच बघायला मिळतं. पण फार कमी वेळ असा इमोशनल नजारा बघायला मिळतो.