प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये माकडाची दहशत; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये पिकला हशा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 12:10 PM2023-12-13T12:10:13+5:302023-12-13T12:12:02+5:30

एका माकडाने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस क्षणार्धात केली रिकामी.

Monkey enter in lucknowand creates panic ituation amongs passengers video goea viral on social media  | प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये माकडाची दहशत; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये पिकला हशा! 

प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये माकडाची दहशत; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये पिकला हशा! 

Viral Video: हल्ली आपल्याला अनेक ठिकाणी माकडे आढळतात. कधी शहरी भागात तर कधी भरवस्तीत ही माकडे अगदी सर्सास वावरताना दिसतात. बऱ्याचदा तर ही माकडे त्यांच्या हरकतीने माणसाला सळो की पळो करून सोडतात. अशाच एका माकडाने धिंगाणा घातल्याचा  व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

लखनौमध्ये चक्क प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये माकडाने हैदोस घातल्याचे पाहायला मिळाले. या माकडाची 'पॉवर' इतकी की प्रवाशांनी भरलेली बस रिकामी करण्याची वेळ आली.  उत्तरप्रदेशातील दुबग्गा सीतापूर बायपास मार्गावरून ही बस जात असताना या बसमध्ये जंगली माकडाने शिरकाव केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. एक आश्चर्याची बाब म्हणजे ज्या क्षणी माकडाने बसमध्ये एंट्री केली त्या वेळी बस कंडक्टरनेच सर्वात आधी पळ काढल्याचे दिसत आहे. पण इतर प्रवासी माकड बाहेर जाण्याची वाट पाहत बसमध्येच बसून राहतात. 
 
बसस्थानकावर प्रवासी बसमध्ये चढताना अचानक या माकडाने बसमध्ये शिरकाव केला. त्यानंतर त्याने बसमध्ये हैदोस घातला. कधी बसच्या सीटवर बसून तर कधी प्रवाशांना त्रास देऊन या माकडाने बसमधील प्रत्येकाच्या नाकी नऊ आणले.  त्यामुळे या माकडाच्या त्रासाला कंटाळून प्रवासी अखेर बसमधून खाली उतरले. लखनौमधील बसमधील हा मजेशीर व्हिडीओला नेटकऱ्यांची भरपूर पसंती मिळते आहे. 

बसमध्ये माकडामुळे निर्माण झालेल्या दहशतीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय नेटकऱ्यांच्या या मजेशीर व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स देखील येत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ :

Web Title: Monkey enter in lucknowand creates panic ituation amongs passengers video goea viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.