खोटा साप बघुन माकडानं केली अशी नाटकं की तुम्ही पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 03:56 PM2021-12-06T15:56:54+5:302021-12-06T15:57:04+5:30

माकडंदेखील माणसांप्रमाणेच प्रत्येक नवीन गोष्ट जाणून आणि समजून घेण्यास उत्सुक असतात. नवीन वस्तू समोर दिसताच ते उघडून पाहण्यास सुरुवात करतात. मात्र, अनेकदा हीच सवय त्यांना चांगलीच महागात पडते. सध्या असाच एक व्हिडिओ (Funny Video of Monkey) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

monkey gets scared of snake prank funny video goes viral | खोटा साप बघुन माकडानं केली अशी नाटकं की तुम्ही पोट धरुन हसाल

खोटा साप बघुन माकडानं केली अशी नाटकं की तुम्ही पोट धरुन हसाल

googlenewsNext

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की माकडाच्या बहुतेक सवयी या माणसांप्रमाणेच असतात. माकडंदेखील माणसांप्रमाणेच प्रत्येक नवीन गोष्ट जाणून आणि समजून घेण्यास उत्सुक असतात. नवीन वस्तू समोर दिसताच ते उघडून पाहण्यास सुरुवात करतात. मात्र, अनेकदा हीच सवय त्यांना चांगलीच महागात पडते. सध्या असाच एक व्हिडिओ (Funny Video of Monkey) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माकड रस्त्याच्या कडेने जात असतं. इतक्यात त्याची नजर एका कापडावर पडते. उत्सुकतेपोटी माकड लगेचच तिथे जाऊन हे कापड उचलतं. या कापडाखाली एक नकली साप असतो. साप पाहताच माकड इतकं घाबरत की ते उडी मारून तिथून पळ काढतं.

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. तर दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, माकड ज्या पद्धतीने घाबरलं ते अतिशय मजेशीर आहे. आणखी एकाने लिहिलं, मालकाने हे करायला नको होतं. याशिवाय इतरही अनेकांनी व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर wonderfuldixe नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यासोबतच त्यांनी मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. बातमी देईपर्यंत व्हिडिओला 53 लाखहून अधिक लाईक आणि करोडो व्ह्यूज मिळाले आहेत.

Web Title: monkey gets scared of snake prank funny video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.