बापरे! बाईकवरून माकड आला अन् चिमुरडीला फरपटत घेऊन गेला, पहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:41 PM2020-05-04T14:41:36+5:302020-05-04T14:56:22+5:30

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काहीवेळासाठी घाबरायला होईल.

Monkey rides bike grabs toddler and drags her everyone shocked viral video myb | बापरे! बाईकवरून माकड आला अन् चिमुरडीला फरपटत घेऊन गेला, पहा व्हायरल व्हिडीओ

बापरे! बाईकवरून माकड आला अन् चिमुरडीला फरपटत घेऊन गेला, पहा व्हायरल व्हिडीओ

Next

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे माणसं आपापल्या घरी सुरक्षित आहेत.  अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर कोणतीही वाहनं दिसत नाहीत. यामुळे वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार सर्वत्र दिसून येत आहेत. माणसांना घाबरून दूर पळून जाणारे प्राणी आरामात रस्त्यावर फिरताना दिसून आले आहेत. पण प्राण्यांनी लॉकडाऊनच्या स्थितीत माणसांवर हल्ले केले आहेत. याचे व्हिडीओसुद्धा सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काहीवेळासाठी घाबरायला होईल. सोशल मीडियावर या माकडाच्या व्हिडीओने धुमाकुळ घातला आहे. या व्हिडीओत एक माकड भरधाव वेगात खेळण्यातील बाईक चालवत आला आणि एका चिमुरडीला खेचून घेऊन गेला आहे. काहीजण या घटनेला पाहून चिमुरडीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत. ( हे पण वाचा-Video : लॉकडाऊनमध्ये माणसं घरात अन् वाघ आपल्या कुटुंबासह थेट तलावात)

हा व्हिडीओ अमेरिकेतील बास्केटबॉल खेळाडू रेक्स चॅपमॅन याने शेअर केला आहे. माकड बाईक चालवत एका गल्लीत घुसतो आणि त्याचवेळी एक लहान मुलगी आपल्या घराबाहेर बसलेली  असते. घराबाहेर बसलेल्या मुलीला हा माकड खेचून घेऊन जात आहे. एक व्यक्ती या चिमुरडीला वाचवण्यासाठी पुढे आला. त्यानंतर हा माकड घाबरून निघून गेला. मग ती मुलगी उठली आणि ज्या ठिकाणी बसली होती. तिथे परत गेली.  या व्हिडीयोला आत्तापर्यंत ४.५ मिलियन व्यूज आणि ५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. १६ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स आहेत. (हे पण वाचा- ट्रॅक्टरवर बसलेल्या शेतकऱ्यांवर वाघाने केला हल्ला, पहा व्हायरल व्हिडीओ)

Web Title: Monkey rides bike grabs toddler and drags her everyone shocked viral video myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.