Video - माकडाशी पंगा घेणं पडलं चांगलंच महागात; WWE स्टाईलमध्ये तरुणाला पाडलं खाली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 16:28 IST2022-10-22T16:20:06+5:302022-10-22T16:28:44+5:30
माकडाच्या कारनाम्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Video - माकडाशी पंगा घेणं पडलं चांगलंच महागात; WWE स्टाईलमध्ये तरुणाला पाडलं खाली अन्...
माकड आलं की अनेकांना भीती वाटते. कारण ते कधी तुमच्या हातामधील एखादी गोष्ट पटकन हिसकावून नेईल सांगता येत नाही. सध्या माकड इतकं हुशार झालं आहे की ते लोकांच्या हातातून स्मार्टफोन देखील खेचून घेतात. माकडाच्या कारनाम्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका व्यक्तीला माकडाशी पंगा घेणं चांगलंच महागात पडलं आहे. माकडाने WWE स्टाईलमध्ये त्या तरुणाला खाली पाडलं.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक माकड घरावर चढत होतं. त्याला पाहताच तरुणाने त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. पण माकड गेलं नाही. त्यानंतर तरुणाने एक दगड उचलून त्या माकडाच्या दिशेने फेकला. पण माकड प्रतिहल्ला करण्यासाठी आधीच तयार होतं. त्याने थेट तरुणाच्या अंगावर उडी घेतली अन् त्याला खाली पाडलं. काही समजायच्या आतच ही घटना घडली.
माकडाचा हा व्हि़डीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. माकडाची तुलना WWE सुपरस्टार्सशी केली जात आहे. माकडाची खाली पाडण्याची स्टाईल पाहून काही युजर्सना प्रसिद्ध ज़ॉन सीनाची आठवण आली. युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला असून ते खळखळून हसले आहे. सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.