चक्क पोलिसवाल्याची टोपी पळवली माकडाने, व्हिडिओ बघुन होईल लहानपणीच्या गोष्टीची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 04:53 PM2022-08-24T16:53:31+5:302022-08-24T16:53:42+5:30

तुम्हाला लहानपणीची टोपीवाल्याची गोष्ट तर आठवतच असेल, ज्यामध्ये टोपीवाला झाडाखाली झोपला असताना माकडं त्याच्या टोप्या घेऊन झाडावर जाऊन बसतात. असंच काहीसं एका माकडाने खऱ्या आयुष्यात केलं आहे. परंतु यावेळी या माकडाने टोपी वाल्याची टोपी पळवलेली नाही, तर त्याने चक्क एका पोलिसवाल्याची टोपी पळवली आहे.

monkey thieves cap of police man video goes viral on social media | चक्क पोलिसवाल्याची टोपी पळवली माकडाने, व्हिडिओ बघुन होईल लहानपणीच्या गोष्टीची आठवण

चक्क पोलिसवाल्याची टोपी पळवली माकडाने, व्हिडिओ बघुन होईल लहानपणीच्या गोष्टीची आठवण

Next

सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात तर काही व्हिडीओ हे उदाहरण म्हणून आपल्यासमोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो तुम्हाला तुमच्या लहानपणाची आठवण करुन देईल, तसेच तो व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमचं हसू देखील आवरणार नाही.

आपल्याल तर हे माहित आहे की, माकडं ही फारच हुशार असतात आणि ते जिथे जातात तेथे ते धुडगुस घालत असतात. त्यात अन्नाची नासाडी करणे, वस्तु उचलणे किंवा पळवूण नेणे हे त्यांचं आवडत काम.

तुम्हाला लहानपणीची टोपीवाल्याची गोष्ट तर आठवतच असेल, ज्यामध्ये टोपीवाला झाडाखाली झोपला असताना माकडं त्याच्या टोप्या घेऊन झाडावर जाऊन बसतात. असंच काहीसं एका माकडाने खऱ्या आयुष्यात केलं आहे. परंतु यावेळी या माकडाने टोपी वाल्याची टोपी पळवलेली नाही, तर त्याने चक्क एका पोलिसवाल्याची टोपी पळवली आहे.

हो, तुम्ही माकडाच्या हातात पाहू शकता. हा माकड इमारतीच्या उंचावर जाऊन बसला आहे आणि त्याच्या हातात एका पोलिसाची टोपी आहे. हा माकड या टोपीला फारच निरखून पाहात आहे आणि त्याचा वापर कसा करतात? यावर विचार करत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पाहून 'टोपीवाला आणि माकडं' या गोष्टीचीच आठवण आली. लोकांनी या व्हिडीओवर जोरदार कमेंट देखील केल्या आहेत.

हा व्हिडीओ Praveen Sharma नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ युपी मधील असल्याचं कळत आहे. लोकांनी भरभरुन या व्हिडीओला लाईक्स आणि शेअर देखील केलं आहे.

Web Title: monkey thieves cap of police man video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.