माकडाच्या हाती लागली भेटवस्तू; पण वापरायची कशी? यासाठी बघा केलं; व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 04:55 PM2020-08-09T16:55:54+5:302020-08-09T17:01:06+5:30
माकडाच्या खोडकरपणाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल.
एका माकडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तुम्ही लॉकडाऊनच्या दरम्यान प्राण्यांचे अनेक गमतीदार व्हिडीओ पाहिले असतील. या व्हिडीओमध्ये माकडाचा खोडकरपणा आणि हूशारी तुम्हाला दिसून येणार आहे. माकडाच्या खोडकरपणाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण असा व्हिडीओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल.
George got a new thermos. Reads the instructions and all... pic.twitter.com/7pwtLWzcvq
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) August 6, 2020
या व्हिडीओमध्ये माकडाला एक माणूस भेटवस्तू देतो. ही भेटवस्तू पाहून माकड खूश होतं आणि ते काय आहे याची उत्सुकता म्हणून उघडून बघतो. या पॅकच्या आत पाण्याची बाटली असते. आधी ती बाटली उघडून माकड बघतो. त्यानंतर बाटलीचा वास घेतो आणि झाकण लावून पुन्हा ठेवतो. सगळ्यात विनोदी प्रकार म्हणजे त्यानंतर बाटलीसोबत आलेलं ब्रोशर माकड वाचतो. एखाद्या शहाण्या माणसाने वाचावं तशाचप्रकार माकडे हे ब्रोशर वाचत आहे.
Not to be a killjoy, but monkeys do not make good pets. They do not belong in homes, chained up, and wearing diapers. In order to be more “tractable”, they are pulled from their mothers at birth to be raised by humans. I look forward to your posts, but this one is a no.
— i need a clever name 🐝 (@gorilla_jen) August 6, 2020
या व्हिडीओला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. 1.1 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. साडेसात हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. समजदार माकड असल्याची कमेंट एका सोशल मीडिया युजरनं केली आहे.
हे पण वाचा-
दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा
लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा
युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा
CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार
मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस