भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 10:36 AM2024-11-19T10:36:44+5:302024-11-19T10:37:53+5:30
एक छोटीशी चूक देखील खूप महागात पडू शकते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वांचाच थरकाप उडाला आहे.
समुद्रातील पाण्यात धमाल करण्याआधी किंवा समुद्रकिनारी बसण्याआधी पाण्याचा अंदाज घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं असं म्हणतात, अन्यथा एक छोटीशी चूक देखील खूप महागात पडू शकते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जो पाहून सर्वांचाच थरकाप उडाला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला आपल्या मुलीसोबत समुद्र किनाऱ्यावर बसली आहे. तेवढ्यात अचानक एक मोठी लाट येते, ज्यामुळे दोघी घसरतात आणि समुद्रातील पाण्यात पडतात. सुरुवातीला त्यांना हे सर्व मजेदार वाटतं. पण लाटा इतक्या वेगाने येतात की त्यांना किनाऱ्यावर यायला देखील जमत नाही. दोघीही बाहेर येण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते शक्य होत नाही.
महिला आणि मुलगी एकमेकांना घट्ट पकडून लाटांमधून बाहेर पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु समुद्राचं पाणी त्यांना आतमध्ये खेचून घेत आहे. मोठमोठ्या लाटांमुळे त्या घाबरतात. त्याचवेळी समुद्रकिनारी असलेली काही माणसं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण लाटा वेगाने येत असल्याने त्यांना देखील सुरुवातीला वाचवणं शक्य होत नाही.
बऱ्याच प्रयत्नांनंतर माय-लेकींना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ९० सेकंदाचा हा धक्कादायक व्हिडीओ आतापर्यंत १७ मिलिहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. युजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. मोठमोठ्या लाटा येत असताना समुद्रकिनाऱ्यावर बसणं धोकादायक असल्याचं म्हटलं आहे.