कडक उन्हात 2 वर्षांच्या लेकीला कारमध्येच विसरली आई; 15 तासांनी आठवलं, परत आल्यावर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 09:29 AM2023-05-22T09:29:25+5:302023-05-22T09:30:45+5:30
दोन्ही मुलं झोपली होती. त्यांची आई त्यांना कामध्येच विसरली. जवळपास 15 तास मुलं कारमध्येच बंद होती.
कडक उन्हात कारमध्ये अडकून एका 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जवळपास मुलगी 15 तास कारमध्ये राहिली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील क्रिस्टोफर मकलीन आणि आई कॅथरीन एडम्स यांना अटक केली आहे. मुलीच्या शरीराचे तापमान 41.6 अंशांवर पोहोचले होते. कारमध्ये एक 4 वर्षांचा मुलगाही बंद होता, मात्र तो सुदैवाने यातून वाचला आहे. त्याला सध्या बाल संरक्षण सेवांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. या प्रकरणाचा तपास केला असता या मुलांची आई त्यांना कारमध्ये विसरल्याचे आढळून आले. तिला जेव्हा याची आठवण आली. तेव्हा ती कारजवळ परतली मात्र चिमुरडी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिने लगेचच इमर्जन्सी नंबरवर कॉल केला. त्यानंतर वैद्यकीय मदत पोहोचेपर्यंत चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कारमध्ये झोपलेली मुलं
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ही दोन्ही मुलं झोपली होती. त्यांची आई त्यांना कामध्येच विसरली. जवळपास 15 तास मुलं कारमध्येच बंद होती. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दोन्ही मुलं कारमध्ये झोपली होती. मुलांना गाडीत सोडून ती घरी झोपायला गेली. दुपारी 3.41 वाजता झोप झाली आणि तेव्हा मुलं गाडीत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पोलिसांनी दाम्पत्याच्या घराची झडती घेतली असता तेथे ड्रग्ज सापडले.
अधिकाऱ्याने मुलीचा मृत्यूचे कारण देखील ड्रग्ज असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले की ड्रग्जमध्ये व्यक्ती वास्तविक जगात काय चालले आहे ते विसरते आणि मग अशा गोष्टी घडतात. पोलिसांनी एडम्स आणि मकलीला अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ बाळगणे आणि मुलाकडे निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.