महिलेने निळ्या रंगाचे डोळे असलेल्या मुलीला दिला जन्म, सासू म्हणाली Paternity test करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:00 PM2022-04-12T18:00:51+5:302022-04-12T18:04:02+5:30

Viral Story : महिलेने सांगितलं की, तिच्या नुकत्याच झालेल्या मुलीचे डोळे निळ्या रंगाचे आहेत. यामुळे सासूला वाटतं की, मी माझ्या पतीला दगा दिला.

Mother in law distrust daughter in law blue eye kid | महिलेने निळ्या रंगाचे डोळे असलेल्या मुलीला दिला जन्म, सासू म्हणाली Paternity test करा

महिलेने निळ्या रंगाचे डोळे असलेल्या मुलीला दिला जन्म, सासू म्हणाली Paternity test करा

googlenewsNext

Viral Story : जेव्हाही परिवारात एखाद्या बाळाचा जन्म होतो तेव्हा लोक नेहमीच असं बोलतात की, बाळ आईसारखं आहे की बाबांसारखं की आजी-आजोबांसारखं...पण एका महिलेने सोशल मीडियावर तिची कहाणी शेअर करत सांगितलं की, तिच्या बाळाचे डोळे निळे असल्याने तिच्या सासूला तिच्यावर संशय आला. महिलेने सांगितलं की, तिच्या नुकत्याच झालेल्या मुलीचे डोळे निळ्या रंगाचे आहेत. यामुळे सासूला वाटतं की, मी माझ्या पतीला दगा दिला.

रेडिटवर महिलेने सांगितलं की, 'सासूला वाटतं की, मी माझ्या पतीला दगा दिला. माझं दुसरीकडे अफेअर सुरू आहे. कारण माझ्या मुलीचे डोळे निळ्या रंगाचे आहेत. माझे आणि माझ्या पतीच्या डोळ्यांचा रंग हेजल ग्रीन आहे'.

महिलेने पोस्टमध्ये लिहिलं की, 'माझ्या वडिलांचे डोळे निळ्या रंगाचे होते. म्हणजे त्यांचे जीन्स माझ्यात आहेत. पण माझ्या सासूच्या परिवारात कुणाचेही डोळे निळे नाहीत. त्यामुळे सासूला वाटतं की, मी दगाबाज आहे. माझं दुसरीकडे अफेअर सुरू आहे.

महिलेने तिच्या पोस्टमध्ये असाही दावा केला की, योग्य माहिती घेण्याऐवजी तिच्या सासू मागणी केली आहे की, आम्ही पॅटरनिटी टेस्ट करावी. जेणेकरून हे समजावं की, मुलगी कुणाची आहे.

रेडिटवर महिलेची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. सासूच्या आरोपांवर यूजर्स फारच नाराज झाले. एका यूजरने लिहिलं की, 'असं वाटतं सासू भ्रमाची शिकार झाली आहे'. तेच एका महिलेने लिहिलं की, 'तिला समजत नाही. माझे डोळे ग्रीन आहेत, माझ्या पतीचे हेजल रंगाचे आहेत आणि आमच्या मुलीचे डोळे डार्क ब्राउन रंगाचे आहेत'.
 

Web Title: Mother in law distrust daughter in law blue eye kid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.