सासून भर लग्नात केला असा धमाकेदार डान्स की नवरी म्हणाली...सासू माझी ढाँसू!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 03:53 PM2021-08-23T15:53:50+5:302021-08-23T15:54:48+5:30
सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल उडवतोय. यात सासूने सुनेच्या समोरच असा काही धमाकेदार डान्स केला की सून आ वासून बघतच राहिली...
लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू ढाँसू निघाली तर...सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर धमाल उडवतोय. यात सासूने सुनेच्या समोरच असा काही धमाकेदार डान्स केला की सून आ वासून बघतच राहिली...
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की नवरी आणि नवरदेव स्टेजवर बसलेले आहेत. इतक्यात नवरदेवाची आई आनंदात स्टेजवर येते आणि मनसोक्त डान्स करू लागते. पटियाला सूटमध्ये असलेल्या नवरीच्या सासूनं स्टेजवर येत असे काही ठुमके लावले की सगळेच हा डान्स पाहत राहिले. यादरम्यान नवरदेवाचा भाऊदेखील स्टेजवर आला आणि त्यानंही डान्स करण्यास सुरुवात केली.
दरम्यान इन्स्टाग्रामवर i.am.sanam या युजरने शेअर केलेल्या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 93 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. इतकंच नाही तर हा व्हिडिओ 10 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं, 'मेरी रॉकस्टार माँ'.