६ वर्षांची असताना मुलीचं झालं होतं अपहरण, १४ वर्षांनी आईला भेटली; लोक झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 06:43 PM2021-09-18T18:43:13+5:302021-09-18T18:47:06+5:30

आज आम्ही तुम्हाला अशा घटनेबाबत सांगणार आहोत, जी वाचल्यानंतर तुमचं मन भरून येईल. ही कहाणी एका अशा मुलीची आहे जिचं ती ६ वर्षांची असताना अपहरण झालं होतं. 

Mother met her daughter after 14 years story went viral on social media | ६ वर्षांची असताना मुलीचं झालं होतं अपहरण, १४ वर्षांनी आईला भेटली; लोक झाले भावूक

६ वर्षांची असताना मुलीचं झालं होतं अपहरण, १४ वर्षांनी आईला भेटली; लोक झाले भावूक

Next

जगात अजून असं पुस्तक लिहिलं गेलं नाहीये, ज्यात आईच्या प्रेमाबाबत सांगितलं असेल. आईचं रूप या जगात सर्वात मोठं आहे. आई आपल्या लेकरांसाठी सर्व सीमा पार करू शकते. अशात विचार करा की, एखाद्या आईची तिच्या लेकरासोबत १४ वर्षांनी भेट होत असेल तर काय होईल? आज आम्ही तुम्हाला अशा घटनेबाबत सांगणार आहोत, जी वाचल्यानंतर तुमचं मन भरून येईल. ही कहाणी एका अशा मुलीची आहे जिचं ती ६ वर्षांची असताना अपहरण झालं होतं. 

एका फेसबुक पोस्टमुळे एक मुलगी तिच्या आईला १४ वर्षांनंतर भेटू शकली. हे मिलन अमेरिका आणि मेक्सिकोच्या बॉर्डरवर झझालं.  एंजेलिका वेन्सेस-सालगाडो नावाच्या एका महिलेने २ सप्टेंबरला पोलिसांना सांगितलं की, एका मुलीने मला फोन करून सांगितलं की, ती माझी मुलगी आहे. त्या मुलीने तिचं नाव जॅकलीन हर्नाडेज सांगितलं होतं.

पोलिसांनी चौकशी सुरू केली तर समोर आलं की, ती मुलगी खरंच त्या महिलेची मुलगी आहे. एंजेलिकाच्या मुलीचं २००७ मध्ये अपहरण झालं होतं. त्यावेळी एंजेलिकाच्या मुलीचं वय ६ वर्ष होतं. आता ती २० वर्षांची झाली आहे. पोलिसांनी १० सप्टेंबरला महिलेला फोन करून माहिती दिली की, ती मुलगी खरं सांगत आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. लोक ही पोस्ट वाचून भावूक झाले आहेत. एका यूजरने लिहिलं की, यावर तर सिनेमा बनायला हवा. तर दुसऱ्याने लिहिलं की, आयुष्यात अशी घटना कुठेच पाहिली नाही. 
 

Web Title: Mother met her daughter after 14 years story went viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.