6 मुलांच्या आईला लागलं PUBG चं व्यसन; खूप दिवस बनवलं नाही जेवण, मुलांची झाली वाईट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 05:10 PM2023-05-09T17:10:24+5:302023-05-09T17:12:26+5:30

गेमचं व्यसन असं होतं की तिने आपल्या 6 लहान मुलांचीही काळजी घेतली नाही.

Mother of 6 children got addicted to PUBG; Food has not been cooked for a long time, the children are in a bad condition | 6 मुलांच्या आईला लागलं PUBG चं व्यसन; खूप दिवस बनवलं नाही जेवण, मुलांची झाली वाईट अवस्था

6 मुलांच्या आईला लागलं PUBG चं व्यसन; खूप दिवस बनवलं नाही जेवण, मुलांची झाली वाईट अवस्था

googlenewsNext

कोणत्याही गोष्टीचं व्यसन नेहमीच चुकीचं असतं. काही गोष्टी य़ा आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. सध्या ऑनलाईन गेमची क्रेझ पाहायला मिळेत. काही लोक कंटाळला आला तर गेम खेळतात. तर काही तासनतास मोबाईलमध्ये गेम खेळण्यात बिझी असतात. पण जास्त वेळ गेम खेळत बसण्याचे दुष्परिणाम देखील आहेत. ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. 

मलेशियामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेला ऑनलाईन गेमिंगची सवय लागली. गेमचं व्यसन असं होतं की तिने आपल्या 6 लहान मुलांचीही काळजी घेतली नाही. ती त्यांना सोडत असत आणि दिवसभर खेळ खेळत असे. ही स्थिती अशी झाली की मुले कुपोषणाची बळी ठरली. आई त्यांची काळजी घेत नाही किंवा त्यांच्यासाठी स्वयंपाक करत नाही. तिचा सर्व वेळ केवळ आणि केवळ खेळ खेळण्यात घालवला गेला.

महिलेच्या बहिणीने हे सोशल मीडिया साइट ट्विटरवर उघड केलं. ट्विटरवर @कॉन्फेस्टवेटीएमवर या महिलेने तिच्या बहिणीच्या व्यसनावर चर्चा केली. तिच्या बहिणीच्या गेमिंगच्या व्यसनामुळे मुलांना त्रास कसा झाला हे तिने सांगितले. अगदी लहान वयातच त्या महिलेचं लग्न झालं होतं. तिला 6 मुलं होती. पण ती मुलांना सोडून दिवसभर ऑनलाईन गेममध्ये व्यस्त असायची.

ऑनलाईन गेम तिला असं व्यसन लागलं होतं की तिला गेमशिवाय दुसरं काहीच सुचायचं नाही. यापूर्वी ती एक व्यवसाय करायची. पण या व्यसनाधीनतेमुळे तिलै तोटा झाला आणि व्यवसाय ठप्प झाला. तिची कार चोरी झाली. आपल्या मुलांबरोबर तिने सर्वात वाईट केलं. ही समस्या इतकी वाढली की महिलेच्या नवऱ्याने देखील तिला घटस्फोट दिला. आता मुलं त्यांच्या आजी-आजोबांच्या जवळ राहतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Mother of 6 children got addicted to PUBG; Food has not been cooked for a long time, the children are in a bad condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.