चिनी वेबसाईटवरून आईने मुलीसाठी मागवला टी-शर्ट.... घरी आला, तेव्हा उडालीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 04:15 PM2019-06-01T16:15:37+5:302019-06-01T16:19:48+5:30
अलिकडे वेगवेगळ्या वस्तूंची घरबसल्या ऑर्डर करण्याची चांगलीच क्रेझ वाढली आहे. पण अशाप्रकारे ऑनलाइन ऑर्डर करण्याचा अनेकांना फटकाही बसला आहे.
अलिकडे वेगवेगळ्या वस्तूंची घरबसल्या ऑर्डर करण्याची चांगलीच क्रेझ वाढली आहे. पण अशाप्रकारे ऑनलाइन ऑर्डर करण्याचा अनेकांना फटकाही बसला आहे. वेळोवेळी अनेक फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. अनेकदा तर ऑर्डर केलं एक आणि घरी आलं दुसरंच असंही होतं. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं आहे. या महिलेने तिच्या तीन वर्षांच्या मुलीसाठी चायनीज ऑनालाइन शॉपिंग स्टोरवरून एक टी-शर्ट ऑर्डर केलं होतं. पण पार्सल उघडून पाहिल्यावर ती अवाक् झाली.
(Image Credit : dailymail.co.uk)
केलसे ड्वॉन विलिमसन असं या महिलेचं नाव असून ती Benton, Illinois इथे राहते. या महिलेने तिच्या मुलीसाठी एक टी-शर्ट ऑर्डर केलं होतं. या टी-शर्टवर दोन बेडूक सायकलवरून जात असल्याचं चित्र होतं. पण जेव्हा हे टी-शर्ट घरी आलं तेव्हा ते पाहून तिला धक्काच बसला. त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार फेसबुक पोस्टमधून समोर मांडला. तिने सांगितलं की, हे टी-शर्ट वेबसाइटवर वेगळं दाखवण्यात आलं आहे.
या महिलेल्या मिळालेल्या टी-शर्टवर बेडकांचं चित्र आहेच. पण सोबतच एक स्लोगनही आहे. "F*** the police असं हे स्लोगन आहे. हे वेबसाइटवर असलेल्या टी-शर्टच्या फोटोवर नाही. अमेरिकेतील या महिलेने त्यानंतर दोन्ही टी-शर्टचे स्क्रीन शॉट सोशल मीडियात शेअर केले. या प्रकारामुळे ही महिला चांगलीच संतापली आहे.
पाहता पाहता या महिलेच्या पोस्टला ६४ हजारांपेक्षा अधिक लाइक्स आणि ३१ हजारपेक्षा अधिक लोकांनी शेअर केली. तर यावर संमिश्र प्रतिक्रियाही आल्या आहेत. काही यूजर्सनी याकडे गंमत म्हणून पाहिलं तर काहींनी चीनच्या वेबसाइटवर टीका केली.