Surprise Gift To Mother On Retirement: मुलगा असावा तर असा! शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या आईला घडवली हेलिकॉप्टरची सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 07:01 PM2022-07-14T19:01:05+5:302022-07-14T19:01:26+5:30

शाळेपासून ते घरापर्यंत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, एवढंच नव्हे तर...

mother retirement son gave helicopter joy riding plot purchased on moon mars gifted thar car | Surprise Gift To Mother On Retirement: मुलगा असावा तर असा! शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या आईला घडवली हेलिकॉप्टरची सफर

Surprise Gift To Mother On Retirement: मुलगा असावा तर असा! शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या आईला घडवली हेलिकॉप्टरची सफर

Next

Surprise Gift To Mother On Retirement: आपलं कुटुंब समृद्ध व्हावे म्हणून पालक आयुष्यभर कष्ट करतात. त्यामुळे पालक जेव्हा सेवानिवृत्ती घेतात तेव्हा त्यांना कार्यालयाकडून सन्मानाने निरोप दिला जातोच, पण त्यांना मुलांकडूनही काही अपेक्षा असतात. कुटुंबातील सदस्य आनंदाने सर्वांना सांगतात की आता आमचे आई-वडील कर्तव्य चोखपणे बजावून सेवानिवृत्त झाले आहेत. पण याच दरम्यान सध्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये एका मुलाने आपल्या आईला सेवानिवृत्तीच्या दिवशी एक अतिशय खास गिफ्ट देऊन सन्मान केला. त्याने ज्या प्रकारे आईचा सन्मान केला, त्याबद्दल ऐकून आणि पाहून गावकरीही थक्क झाले.

आदर्श सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका बिमला देवी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा मुलगा अरविंद कुमार याने त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली. हा अद्भूत प्रकार राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील लक्ष्मणगढ उपविभागातील घस्सू गावात घडला. गावात हेलिकॉप्टर आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वास्तविक, उपविभागातील घस्सू गावातील आदर्श सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात वरिष्ठ शिक्षिका म्हणून कार्यरत असलेले सेवानिवृत्त शिक्षक सुलतान सिंग यांच्या बिमला देवी या पत्नी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी बिमला देवी निवृत्त झाल्या. त्याच दिवशी त्यांचा मुलगा अरविंद कुमार याने दिल्लीहून हेलिकॉप्टर मागवले आणि आई-वडिलांसह कुटुंबातील सदस्यांना हेलिकॉप्टरमधून 'जॉय राईड' म्हणजेच आनंदाची सफर घडवून आणली.

एवढेच नाही तर मुलाने हेलिकॉप्टरमधून आपल्या आईवर पुष्पवृष्टी केली. हा सारा प्रकार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवानिवृत्त झालेल्या ज्येष्ठ शिक्षिका बिमला देवी यांचा मुलगा अरविंद कुमार याने आदर्श घालून दिला आणि पालकांसह कुटुंबाला हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून आनंदोत्सव साजरा करत सेवानिवृत्ती संस्मरणीय केली. सरकारी शाळेपासून संपूर्ण गावात फुलांचा वर्षाव झाला. याशिवाय मुलाने पालकांना एक आलिशान थार गाडी, व्हर्च्युअल मेटाव्हर्समध्ये घर आणि चंद्र-मंगळावर एक प्लॉट गिफ्ट केला. म्हणूनच घस्सू गावासह अनेक शहरांमध्ये मुलाची खूप प्रशंसा केली जात आहे.

Web Title: mother retirement son gave helicopter joy riding plot purchased on moon mars gifted thar car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.