Video - बाईक चालवताना मुलाने केली चूक; आईने रस्त्यातच घडवली अद्दल, मारलं अन् म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 12:40 PM2023-05-14T12:40:14+5:302023-05-14T12:49:13+5:30

एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आई आपल्या मुलाला रस्त्याच्या मधोमध ओरडताना दिसत आहे.

mother scolds son for not driving wearing helmet inspirational video viral on social media | Video - बाईक चालवताना मुलाने केली चूक; आईने रस्त्यातच घडवली अद्दल, मारलं अन् म्हणाली...

Video - बाईक चालवताना मुलाने केली चूक; आईने रस्त्यातच घडवली अद्दल, मारलं अन् म्हणाली...

googlenewsNext

पालक आपल्या मुलांसाठी सर्वकाही करतात. पण काही वेळा मुलांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यामुळे पालकांना कठोर वागावे लागते. नुकताच सोशल मीडियावर आई आणि मुलांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो प्रत्येक पालकांनी पाहावा. व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला रस्त्यातच धडा शिकवताना दिसत आहे. रस्त्यावर लोकांची गर्दी होते. एक सुंदर संदेश देणारा आई-मुलाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप बघितला जात आहे आणि खूप लाइक केला जात आहे. 

व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलांना त्याच्या सुरक्षेसाठी खडसावताना दिसत आहे. रस्त्यावर चालताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा रस्त्यावर, हेल्मेट नसलेले काही दुचाकीस्वार वेगाने गाडी चालवताना दिसतात, जे काहीवेळा त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी धोकादायक ठरतात. पोलिसही हेल्मेट घालायलाच हवे असे समजावून सांगतात, तरीही काही लोक त्यांच्या कृत्यापासून परावृत्त होत नाहीत आणि त्यांचा तसेच इतरांचा जीव धोक्यात घालतात. 

अलीकडे असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक आई आपल्या मुलाला रस्त्याच्या मधोमध बाईक चालवताना थांबवल्यानंतर हेल्मेट न घातल्यामुळे मुलाला ओरडताना दिसत आहे. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांना प्रकरण काय आहे हे समजत नाही, परंतु जेव्हा आईने आपल्या मुलांना हेल्मेटचा सल्ला देताना ऐकले तेव्हा त्यांना संपूर्ण प्रकरण समजले. व्हिडीओमध्ये आई मुलांना मारताना दिसत आहे. 

मुलगा जवळच जात असल्याचे सांगतो, मग हेल्मेट घालण्याची काय गरज आहे. यावर आई समजावते की हे आवश्यक आहे, कारण अपघातांची खात्री नसते. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आता पालक जागरूक झाले जीवन असेल तर जग आहे. कृपया हेल्मेट वापरा." 2 मिनिटे 20 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 58 हजार वेळा पाहिला गेला आहे, तर 1 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mother scolds son for not driving wearing helmet inspirational video viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.