आईला पॅरेलिसिस, बापाचेही झाले निधन; अंत्यसंस्कारासाठी दोन्हीही मुले आली नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:25 PM2023-06-14T16:25:01+5:302023-06-14T16:25:40+5:30
२ वर्षापूर्वी शहीद भगत सिंह सेवा दलाचे जितेंद्र सिंह शंटी यांची मुलाखत घेतली होती. ते सामाजिक कार्यकर्ता आहेत.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पगडी घातलेला एक सरदार सांगतो की, दोन्ही मुले अमेरिकेत आहेत. पत्नीला पॅरेलिसिस झालाय. पती तिची सेवा करतो. परंतु एकेदिवशी सकाळी पती तिला दिसत नाही. तिला स्वत:ला उठता येत नाही. त्यानंतर पती दुसऱ्या बेडवर मृत पडल्याचे तिला दिसते. पती या अवस्थेत असतानाही तिला जागेवरून उठवण्याची ताकद नसते.
खूप लांब एक फोन असतो, ३-४ तास रेंगाळत ती तिथे पोहचते. फोन लावते पण बोलू शकत नव्हती. शहीद भगत सिंह सेवा दलाचा फोन येतो. त्यानंतर काही स्वयंसेवक घरी येतात. परंतु पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचेही निधन होते. अमेरिकेत राहणाऱ्या मुलांना फोन केला जातो. परंतु ते आम्हाला यायला खूप वेळ होईल तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या असं सांगतात हे सर्व सांगताना सरदारचा कंठ दाटून येतो.
काहीवेळ शांत बसल्यानंतर पुढे म्हणतात, मृत्यूनंतर आई वडिलांना खांदा द्यायला अनेकजण पुढे आले. परंतु ज्यांना त्यांनी जन्म दिला तेच खांदे नव्हते. हा व्हिडिओ २ वर्षापूर्वी शूट केलेल्या एका मुलाखतीचा भाग आहे. हा पुन्हा व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून अनेकजण त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत.
दिलीप कुमार सांगतात की, हे कटू सत्य आहे बहुतांश आई वडिलांचे. ज्यांनी त्यांचे आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांना चांगले आयुष्य मिळावे यासाठी घालवले. तर कसली मुले आहेत ज्यांना त्यांच्या आई वडिलांचे अंत्यदर्शनही घ्यायचे नाही. यापेक्षा मुले नसलेली चांगली असं यूजर्स उत्कर्ष गुप्ता यांनी लिहिलं. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून मुलांच्या संवेदना मेल्यात, अतिशय दु:खद अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
२ वर्षापूर्वी शहीद भगत सिंह सेवा दलाचे जितेंद्र सिंह शंटी यांची मुलाखत घेतली होती. ते सामाजिक कार्यकर्ता आहेत. गरजूंसाठी सेवा देणे हे त्यांचे ध्येय आहे. ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. मी पैसेवाल्यांच्या डोळ्यात अश्रू पाहिले नाहीत. ते आई वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आले असते तरीही मोठी गोष्ट होती. ज्यांची मुले अमेरिका, कॅनडासारख्या देशात आहेत ते शंटी यांना फोन करून आम्ही येऊ शकत नाही तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या असं सांगतात.
मुलाखतीत रिचा अनिरुद्ध विचारते की, तुम्हाला राग येत नाही? शंटी म्हणतात की, मला राग आला तरी काय करणार पण मला सल्ले मिळतात की ज्यांच्यासाठी आपण सर्व काही करतो ते आपल्यासाठी काय करत आहेत. आई, बाप देह मारून, मन मारून... बाप घरी सामान आणतो तेव्हा खिशात पैसे नसतात. कुठूनतरी उधारीवर आणतो. पण कुठूनही आणतो आणि मुलाची फी भरतो. पण जेव्हा ते वडील वारतात आणि मुलं सेटल होतात तेव्हा ते अंत्यसंस्कार करायलाही येत नाहीत.