मुलगा टीव्हीवर कार्टून बघतोय म्हणून आई गेली आंघोळीला, इकडे मुलाच्या क्यूट कारनाम्याचा फोटो झाला व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:52 AM2020-02-11T11:52:02+5:302020-02-11T11:55:15+5:30

लहान मुले कधी काय करतील याचा खरंच काही नेम नसतो. याच अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेलच. त्यामुळेच त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं.

Mother thinks that her son is watching cartoon but he was stand naked near window photo goes viral | मुलगा टीव्हीवर कार्टून बघतोय म्हणून आई गेली आंघोळीला, इकडे मुलाच्या क्यूट कारनाम्याचा फोटो झाला व्हायरल!

मुलगा टीव्हीवर कार्टून बघतोय म्हणून आई गेली आंघोळीला, इकडे मुलाच्या क्यूट कारनाम्याचा फोटो झाला व्हायरल!

googlenewsNext

लहान मुले कधी काय करतील याचा खरंच काही नेम नसतो. याच अनुभव तुम्हालाही अनेकदा आला असेलच. त्यामुळेच त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. असं जर केलं नाही तर ते असा काही कारनामा करतात की, पालक हैराण झालेले असतात. आता हाच मुलगा बघा ना....Dax असं या मुलाचं नाव असून तो दोन वर्षांचा आहे. त्याच्या आईला वाटलं की, तो टीव्हीवर कार्टून बघतोय. अचानक आईच्या फोनवर मेसेज आला. ज्यातील फोटोत Dax खिडकीत नग्न होऊ उभा आहे.

Jeni Boysen म्हणजे Dax च्या आईने सांगितले की, त्यांची शेजारी Laura ने हा मेसेज मला पाठवला होता. त्यात तिच्या मुलाचा फोटो होता. तो खिडकीत नग्न होऊ उभा होता आणि खाली बघत होता. आता ज्यांनी ज्यांनी हा फोटो पाहिला ते पोटधरून हसू लागले. कारण एकतर असा त्यांनी केलेला कारनामा त्यांना आठवला असेल नाही तर त्यांच्या मुलांचा कारनामा आठवला असेल. 

Jeni ने सांगितले की, ती आंघोळीला गेली होती. बस इतक्यात डॅक्सने हा कारनामा केला. जेव्हा ती आंघोळ करून परत आली तेव्हा डॅक्स त्याच्या वडिलांसोबत बसून टीव्ही बघत होता. आता डॅक्सचा हा फोटो व्हायरल झाला आहे. बालपणी सगळ्यांनी असे काहीना काही क्यूट कारनामे केले असतील. जे आजही आठवले तर चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं. डॅक्सच्या या कारनाम्याने अनेकांना बालपणात घेऊन जाण्याचं काम केलंय.


Web Title: Mother thinks that her son is watching cartoon but he was stand naked near window photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.