मां तुझे सलाम! पावसात भिजण्यापासून लेकाला वाचवण्यासाठी आईची धडपड; हृदयस्पर्शी Video

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 03:24 PM2023-06-23T15:24:35+5:302023-06-23T15:38:34+5:30

सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक भावूक झाले आहेत

mother trying to save son from rain internet gets emotional says no one can take place of mother video | मां तुझे सलाम! पावसात भिजण्यापासून लेकाला वाचवण्यासाठी आईची धडपड; हृदयस्पर्शी Video

मां तुझे सलाम! पावसात भिजण्यापासून लेकाला वाचवण्यासाठी आईची धडपड; हृदयस्पर्शी Video

googlenewsNext

आईचं आपल्या मुलांवर खूप प्रेम असतं. कोणत्याही संकटात ती खंबीरपणे उभी असते, ती आई आपल्या मुलांना कधीही एकटं सोडत नाही. मुलांवर येणारी प्रत्येक संकटं ती स्वतःवर घेते. सोशल मीडियावर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक भावूक झाले आहेत आणि व्हिडीओने लोकांची मनंही जिंकली आहेत. एक आई आपल्या मुलाची कशी जास्त काळजी घेते हे हा व्हिडीओ पाहून नक्कीच कळेल. 

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रात्रीची वेळ आहे आणि पाऊस पडत आहे. लोक ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत, जिथे आई आणि मुलगा बाईकवर बसलेले दिसतात. आई स्वतः पावसात भिजताना दिसत आहे, पण आपल्या मुलाला भिजण्यापासून वाचवण्यासाठी, मुलगा पावसात भिजू नये म्हणून तिने हातातल्या पिशवीने मुलाचं डोकं झाकलं आहे. आई स्वतः भिजत आहे पण मुलगा भिजू नये यासाठी प्रयत्न करत आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. @SuhanRaza4 नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक वेळाहा व्हिडीओ पाहिला गेला आहे. या 11 सेकंदाच्या क्लिपच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "आई प्रत्येकाची जागा घेऊ शकते, परंतु आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही."

आई-मुलाचं नातं हे नेहमीच खूप खास असतं. लोक या सुंदर व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलं की - आईशिवाय दुसरं कोणीच नाही. आणखी एका युजरने आई तिच्या मुलांसाठी काहीही करू शकते असं म्हटलं आहे. सध्या याच व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: mother trying to save son from rain internet gets emotional says no one can take place of mother video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.