MS Dhoni New Car Video: धोनीची नव्या कारमधून ऋतुराज गायकवाड, केदार जाधवसोबत 'लाँग ड्राईव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:53 AM2022-11-19T11:53:47+5:302022-11-19T11:54:19+5:30
धोनी स्पोर्ट्स बाईक आणि आलिशान कारचा प्रचंड मोठा चाहता आहे
MS Dhoni New Car Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानापासून दूर असला तरी त्याचे फोटो -व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याचे कारण म्हणजे त्याचा मोठा चाहता वर्ग. धोनीने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. दरम्यान, धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो नवीन कार चालवताना दिसत आहे. Ruturaj Gaikwad आणि Kedar Jadhav या दोन भारतीय क्रिकेटपटूंसोबत तो वेगवान सफरीला निघल्याचा हा व्हिडीओ आहे.
धोनीने खरेदी केली नवी कार
धोनी निवृत्तीनंतर आपले आयुष्य अतिशय मजेत जगत आहे. कधी तो एखाद्या इव्हेंटमध्ये दिसतो, कधी त्याच्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत असतो, कधी टेनिस मॅच बघताना तर कधी टेनिस खेळतानाही दिसतो. धोनीच्या चाहत्यांना त्याची प्रत्येक स्टाईल आवडते. त्याला बाईक रायडिंग आणि महागड्या कार्सची आवड आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. त्याने नुकतीच नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV6 खरेदी केली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की धोनी त्याच्या चेन्नई सुपर किंग्जच्या दोन खेळाडूंसोबत गाडीच्या गेटवर उभा आहे. त्याच्यासोबत केदार जाधव आणि युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड दिसत आहेत. दोन्ही खेळाडूंनी धोनीसोबत नवीन कारमध्ये फिरण्याचा आनंद लुटला. हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आला आहे. रांचीच्या रस्त्यावर फिरतनाचा हा व्हिडीओ आहे.
.@MSDhoni takes Ruturaj Gaikwad on a Car Ride at Ranchi yesterday. 😍💛pic.twitter.com/HIxVRMGTnB
— DHONI Era™ 🤩 (@TheDhoniEra) November 17, 2022
धोनी हा 3 ICC ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मोठे टप्पे गाठले आणि देशवासियांना सेलिब्रेशनच्या अनेक संधी दिल्या. 3 ICC ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. टीम इंडियाने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक, 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्याने आपल्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय सामने आणि 98 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 17,000 हून अधिक धावा केल्या.