सलाम! पत्नीच्या आग्रहास्तव तिचे दागिने विकून मोफत ऑक्सिजन मोफत वाटतोय 'हा' देवमाणूस 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 06:51 PM2021-05-02T18:51:21+5:302021-05-02T19:01:35+5:30

Mumbai pascal saldanha whose wife sold her jewellery : गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनसाठी कोणाचा जीव जातोय तर अनेकांची फरपट होत आहे.

Mumbai pascal saldanha whose wife sold her jewellery for helping people news | सलाम! पत्नीच्या आग्रहास्तव तिचे दागिने विकून मोफत ऑक्सिजन मोफत वाटतोय 'हा' देवमाणूस 

सलाम! पत्नीच्या आग्रहास्तव तिचे दागिने विकून मोफत ऑक्सिजन मोफत वाटतोय 'हा' देवमाणूस 

Next

कोरोनामुळे संपूर्ण देशाला संकटांचा सामना करावा लागत आहे. देशातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या कालावधीत माणुसकीचे दर्शन घडवत असलेल्या अनेक घटना समोर येत आहेत. मुंबईतील अनेक रुग्णालयातही ऑक्सिनजनची कमतरता असताना एक मंडप डेकोरेशनचे काम करत असलेल्या व्यक्तीनं मदतीचा हात दिला आहे. आपल्या पत्नीच्या आग्रहास्तव ही व्यक्ती  सगळ्यांना मोफत ऑक्सिजन देत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनसाठी कोणाचा जीव जातोय तर अनेकांची फरपट होत आहे. अशा कठीण काळात लोकांना मदतीचा हात देत असलेल्या या व्यक्तीचे नाव पास्कल आहे. 

वृत्तसंस्था एएनआयनं ट्विट करत यासंबंधी अधिक माहिती दिली आहे.  पास्कल सल्धाना  १८ एप्रिलपासून लोकांची मदत करत आहेत. ते सतत लोकांना मोफत ऑक्सिजन पुरवण्याच्या प्रयत्नात आहेत. एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, ''मी माझ्या पत्नीच्या आग्रहास्तव तिचे दागिने विकले आणि त्यातून आम्हाला ८० हजार मिळाले. या पैश्यातून मी गरजू लोकांना ऑक्सिजन पुरवत आहे.''  वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

पुढे त्यांनी सांगितले की, ''माझी पत्नी डायलिसिस आणि ऑक्सिजन सपोर्टवर असायची. म्हणून आमच्याकडे नेहमी स्पेअर सिलेंडर असतो. एके दिवशी शाळेच्या मुख्याध्यापकांनी माझ्याकडे ऑक्सिजन सिलेंडरची मागणी केली. तेव्हादेखील मी पत्नीच्या सांगण्यावरून त्यांना ऑक्सिजन सिलेंडर दिला होता.'' लोकांना पास्कल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसंच या पोस्टवर खूप लाईक्स आणि कमेंट्स केल्या जात आहेत. नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं 

Web Title: Mumbai pascal saldanha whose wife sold her jewellery for helping people news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.