सॅल्यूट! रेल्वे ट्रॅक ओलांडता ओलांडता ट्रेन आली; अन् जवानाच्या प्रसंगावधानमुळे मोठा अनर्थ टळला
By manali.bagul | Published: January 3, 2021 11:11 AM2021-01-03T11:11:33+5:302021-01-03T11:15:42+5:30
Trending Viral News in Marathi : सोशल मीडियावर सध्या मुंबईच्या दहिसर रेल्वे स्टेशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडत असलेल्या एका ६० वर्षीय माणसाचा महाराष्ट्र पोलिसांच्या जवानानं जीव वाचवला आहे.
रेल्वेचे नियम मोडून ट्रॅक वरून चालणं, विना तिकिट प्रवास करणं यात काही नवीन नाही. पण अशाच चूका अनेकदा मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरू शकतात. सोशल मीडियावर सध्या मुंबईच्या दहिसर रेल्वे स्टेशनचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडत असलेल्या एका ६० वर्षीय माणसाचा महाराष्ट्र पोलिसांच्या जवानानं जीव वाचवला आहे. शेवटच्या सेंकदाला या जवानाची नजर या माणसावर पडली आणि मोठा अनर्थ टळला.
#WATCH | Maharashtra: A constable of Mumbai Police helped a 60-year-old man, who got stuck at a railway track, save his life at Dahisar railway station in Mumbai yesterday. pic.twitter.com/lqzJYf09Cj
— ANI (@ANI) January 2, 2021
या व्हिडीओतील ६० वर्षीय काका रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत होते. तितक्यात त्यांचा बूट रूळात अडकला. समोरून ट्रेन येत होती म्हणून ते पुन्हा मागे गेले. काही क्षणातच ते पुन्हा प्लॅटफॉमच्या दिशेने धावले. याचवेळी ट्रेन आल्यानं या काकांचा जीव जाण्याचा धोका होता. वेळीच पोलीस जवानानं पाहिलं आणि या माणसाला आणि प्लॅटफॉर्मवर खेचून जीवदान दिलं.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता पोलिस जवान या माणसाला मारताना दिसून येत आहे. ही घटना १ जानेवारीला ११ वाजून ३६ मिनिटांनी घडली. आतापर्यंत १ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ९ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. काय सांगता? ब्रेन सर्जरी करताना मरण येऊ नये म्हणून 'ही' बाई वाचत होती गीतेचे श्लोक, डॉक्टर म्हणाले...
सोशल मीडिया युजर्सनी संतप्त प्रतिक्रिया व्हिडीओवर व्यक्त केल्या आहेत. या काकांना अजून मारायला हवं असं अनेकांनी म्हटलं आहे. कारण या चुकीमुळे जीव गमवावा लागला असला. जवावानं प्रसंगावधान दाखवल्यामुळे या माणसाचा जीव वाचला . PM मोदींच्या फॅन झाल्या आजीबाई; अन् गाणं 'अस' गायलं की जगभरात झाल्या VIRAL