आता मुंबई पोलिसांचाही नारा 'बुलाती हैं मगर जानेका नहीं'...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 02:23 PM2020-03-19T14:23:20+5:302020-03-19T14:24:05+5:30
हे ट्विट मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलं आहे. यात प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा फोटोही वापरला आहे.
कोरोना व्हायरसवरून सोशल मीडियात मीम्स तर अनेक व्हायरल झालेत. पण मुंबई पोलिसांनी जे मीम शेअर केलं ते सर्वांना रिलेट करेल. एकप्रकारचे हे मीम कोरोना व्हायरसबाबत अॅडव्हायजरी आहे. जेणेकरून लोक एकत्र येऊ नये किंवा लोकांमध्ये अंतर रहावं. कारण राज्यात कोरोना पीडितांची संख्या वाढत आहे. म्हणूनच लोकांना मुंबई पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केलाय 'बुलाती है मगर जानेका नहीं'.
Jo Virus Hai Vo Phaillane Ka Nai! #TakingOnCorona#Coronavirus#CovidIndiapic.twitter.com/en3BHGFohh
— Mumbai Police (@MumbaiPolice) March 19, 2020
हे ट्विट मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलं आहे. यात प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा फोटोही वापरला आहे. ज्यात ते मास्क लावून आहेत. याला कॅप्शन दिलंय, 'जो व्हायरस है वो फैलाने का नहीं.
या गमतीदार ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना लोकांना हे सांगायचं आहे की, व्हायरसचा प्रभाव वाढू नये म्हणून बाहेर जाऊ नका. म्हणजे घरात रहा आणि सुरक्षित रहा.
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी साहेबांची ही गझल आहे.
'बुलाती है मगर जाने का नईं
ये दुनिया है इधर जाने का नईं
मेरे बेटे किसी से इश्क़ कर
मगर हद से गुजर जाने का नईं
सितारें नोच कर ले जाऊँगा
मैं खाली हाथ घर जाने का नईं
वबा फैली हुई है हर तरफ
अभी माहौल मर जाने का नईं
वो गर्दन नापता है नाप ले
मगर जालिम से डर जाने का नईं
Hahah Epic😂
— Adv. Ashutosh J Dubey (@iamashu123) March 19, 2020
Today's generation understands this language, What we call meme,
Very good way to spread awareness among people👍👌
लोकांना मुंबई पोलिसांचा हा क्रिएटीव्ह अंदाज फारच आवडला. आता राज्यात कोरोनाच्या 44 केसेस झाल्या आहेत. तर देशभरात 172 रूग्ण झाले आहेत. अशात लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.