'अति घाई संकटात नेई...'! चालत्या ट्रेनमधून पडलेली महिला रेल्वेखाली जाणार इतक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 03:35 PM2023-12-23T15:35:52+5:302023-12-23T15:37:13+5:30
मुंबईतील महिला रेल्वे कॉन्स्टेबलची कामगिरी पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Viral Video : देशभरात रेल्वे प्रवासात दुर्घटनांचे सत्र कायम आहे. मुंबई लोकलच्या प्रवासात दरवाजाजवळ उभं असताना, खांबाला धडकून किंवा ट्रेन पकडताना दुर्घटना होत असतात. काहीवेळा प्रवाशांना या अशा दुर्घटनांमध्ये प्राणाला मुकावे लागते, तर काहीवेळा नशीब बलवत्तर असल्यामुळे प्रवाशी बचावतात. अशाच एका रेल्वेमधील घटनेचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाचा जीव धाडसी महिला कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येते आहे. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही प्रत्यक्षात त्याचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. मुंबईच्या धावपळीच्या प्रवासात अनेकदा प्रवाशी जीव धोक्यात घालून ट्रेन पकडतात. काहींना धावती ट्रेन पकडताना जीव गमवावा लागला आहे. पण यातून रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास थांबला नाही.
सध्या सोशल मीडियावर मुंबईतील एका रेल्वे अपघातात थोडक्यात बचावलेल्या माहिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका एक्स यूजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला चालत्या रेल्वेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र अती घाई करणे महिलेला चांगलेच महागात पडले. धावती ट्रेन पकडताना अचानक ट्रेनच्या पायरीवरून तिचा पाय घसरतो आणि ही महिला ट्रेनमधून खाली फलाटावर पडते. दरम्यान, या महिलेचे तोंड रेल्वेखाली जाईल इतक्यात क्षणाचाही विलंब न करता रेल्वे स्थानकावर गस्तीला असणाऱ्या महिला कॉन्स्टेबलने मदतीचा हात पुढे केला. या अपघातग्रस्त महिलेचा कॉन्स्टेबलने पाय धरत तिला बाहेर खेचून काढले. या चित्तथरारक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.
येथे पाहा व्हिडीओ :
Fearless Female RPF Officer Springs into Action🚉💪🏽
— Western Railway (@WesternRly) December 20, 2023
Her timely rescue not only saved a life but also carries a vital message:
'Do not board or alight from a moving train'🛤️#WednesdayWarriorspic.twitter.com/rLHQiz0Kxn