जगातल्या अशा पाच गोष्टी ज्यांचं सत्य अजूनही रहस्यच!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 02:56 PM2019-07-01T14:56:13+5:302019-07-01T15:00:08+5:30
जगभरात आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांबाबतचं सत्य कुणाला माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रहस्यमयी गोष्टींबाबत सांगणार आहोत.
जगभरात आजही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांबाबतचं सत्य कुणाला माहीत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही रहस्यमयी गोष्टींबाबत सांगणार आहोत, ज्यांचं गुपित आजपर्यंत उघडलं गेलं नाही. या रहस्यमयी गोष्टींबाबत जाणून घेऊन तुम्हीही विचारात पडाल.
केनियाच्या रुडोल्फ लेकजवळ असलेल्या या आयलंड 'नो रिटर्न' आयलंड म्हणतात. आता या आयलंडवर कुणी राहत नाही. असे म्हटले जाते की, अनेक वर्षांपूर्वी इथे लोक राहत होते, पण एक दिवस ते सगळे अचानक गायब झाले. त्यांची माहिती आजपर्यंत मिळू शकली नाही. असंही म्हणतात की, आजही कुणी या आयलंडवर गेलं तर परत येत नाही.
व्यक्तीचं नाव ली चिंग युएन आहे. यांच्याबाबत म्हटलं जातं की, हे २५६ वर्षे जिवंत होते. चीनला राहणारे ली चिंग हे औषधांचे मोठे जाणकार होते आणि यासाठी त्यांना वयाच्या १०० व्या वर्षी सरकारकडून बक्षीसही देण्यात आलं होतं. असे म्हणतात की, २०० वय झाल्यावरही ते विश्वविद्यालयात लेक्चर देण्यासाठी जात होते. तसेच त्यांनी २४ लग्ने केली होती. पण त्यांचं हे वय आजही रहस्य बनून आहे.
या दगडांचा शोध जवळपास १९३० मध्ये लावला होता. १६ टन वजनी या दगडांना हाताने तयार केलं होतं. सर्वात छोट्या दगडाची आकृती एखाद्या टेनिस बॉलसारखी आहे. घनदाट जंगलात अशाप्रकारची आकृती तयार करणे जवळपास अशक्य आहे. हे दगड कुणी तयार केले, का केले? हे आजपर्यंत एक रहस्यच आहे.
याप्रकारची आकृती जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळते. काही लोकांचं मत आहे की, हे एलिअन्सचं काम असू शकतं. तर काहींना वाटतं की, हे चक्रीवादळामुळे तयार झालं असावं. पण इतकी सुंदर आकृती कुणी तयार केली असेल हे आजही गुपित आहे.
(Image Credit : History)
स्कॉटलॅंडमध्ये एक २०० मीटर खोल लेकमध्ये एक रहस्यमयी जीव आढळला होता. १९३४ मध्ये लंडनच्या एका डॉक्टरने या जीवाचा फोटो त्यांच्या कॅमेरात कैद केला होता. हा जीव लाखों वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नष्ट झालेल्या जीवांसारखा वाटतो.