Nagin Dance in Wedding Viral Video: भन्नाट नागिन डान्स! नवरदेवाच्याच घोडीवर चढून मित्राने घातला धुमाकूळ; भले भले डान्समास्टरही लावतील डोक्याला हात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:38 AM2022-01-31T10:38:53+5:302022-01-31T10:40:26+5:30

लग्नाच्या वरातीत 'नागिन डान्स' हवाच, असं म्हणणाऱ्यांनी पाहायलाच हवा व्हिडीओ

Nagin Dance in Wedding Viral Video on Social Media Man dancing on horse when groom sitting behind him Comedy Incidence | Nagin Dance in Wedding Viral Video: भन्नाट नागिन डान्स! नवरदेवाच्याच घोडीवर चढून मित्राने घातला धुमाकूळ; भले भले डान्समास्टरही लावतील डोक्याला हात

Nagin Dance in Wedding Viral Video: भन्नाट नागिन डान्स! नवरदेवाच्याच घोडीवर चढून मित्राने घातला धुमाकूळ; भले भले डान्समास्टरही लावतील डोक्याला हात

googlenewsNext

Nagin Dance in Wedding Viral Video: भारतात लग्न असलं की मित्रांना खूपच महत्त्व असतं. मित्रांशिवाय नवरदेवाला लग्न अपूर्ण वाटतं असं म्हटलं तरीही फारसं वावगं ठरणार नाही. त्यातही वऱ्हाडी आणि वरातीत नाचणारे मित्रमंडळी यांना तर एक विशेष स्थान असतं. कारण हेच लोक लग्नात जमतात आणि मौज मजा करून साऱ्यांचाच थकवा अन् ताण घालवतात. सध्या अशाच एका मित्राचा व्हिडीओ (marriage viral video) सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतो. या व्हिडिओतील मित्र नवरदेवाच्या घोडी चढून नागिन डान्स (Nagin dance) करतोय. इतकंच नव्हे तर तो घोडीवर बसल्या बसल्या सर्कसमधील कसरतींसारखा डान्स करतोय, जे पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल.

लग्नाच्या वरातीत अनेक लोक नागिन डान्स करताना दिसतात. बरेच लोक नाचण्यात इतके मग्न होतात की ते डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचतात. पण सध्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मित्र घोडीवर बसून नागिन डान्स करत आहे. नवरदेवही याच घोडीवर बसलेला आहे. अशा परिस्थितीतही तो मित्र घोडीवर बसून कलाबाजी दाखवत भाव खाऊन जाताना दिसतोय. पाहा व्हिडीओ-

नवरदेवाची वरात सुरू असताना नाचणारा एक मित्र अचानक उडी मारून वराच्या घोडीवर बसतो आणि नागिन डान्स सुरू करतो. आश्‍चर्य म्हणजे त्या वेळी नवरदेवही घोडीवर मागे बसलेला असतो. नवरदेवाच्या तोंडात दाबलेले पैसेदेखील हा कलाकार हळूवारपणे काढून घेताना दिसतो आणि आनंदाने नाचतानाही दिसतो.

हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलंय की, 'मित्राच्या नागिन डान्सने आग लावली...!' दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलंय की, 'या नागिन डान्सने फिजिक्सचे सगळे नियम चुकीचे असल्याचं सिद्ध केलं.' दरम्यान हा मजेदार व्हिडिओ Godman Chikna हा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हि़डीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

Web Title: Nagin Dance in Wedding Viral Video on Social Media Man dancing on horse when groom sitting behind him Comedy Incidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.