नारायण मूर्ती आणि ओरी यांच्यात '70 तास काम' विषयावर चर्चा व्हावी; हर्ष गोयंक यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 03:41 PM2023-12-13T15:41:24+5:302023-12-13T15:42:31+5:30
उद्योगपती हर्ष गोयंका यांनी नारायण मूर्ती आणि ओरी यांच्यात चर्चेची मागणी केली आहे.
इन्फोसिसचे (Infosys) सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांच्या आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या वक्तव्याने देशात वेगळीच चर्चा सुरू झाली. नारायण मूर्तींच्या या विधानाचे कुणी समर्थन केले तर कुणी असहमती व्यक्त केली. दरम्यान, नारायण मूर्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरी अवतारमणी यांच्यात या विषयावर चर्चा व्हावी, अशी मागणी एका भारतीय अब्जाधीशाने केली आहे.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक विनोदी पोस्ट टाकली आणि लिहिले की, नारायण मूर्ती आणि ओरी यांच्यात 70 तास काम करण्याच्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. कुणी हा संवाद आयोजित करू शकतो का, असा सवाल त्यांनी केला.
Can someone please organize a conversation between Narayana Murthy and Orry on the need of a 70 hour working week! 😀 pic.twitter.com/9svQvvYO9s
— Harsh Goenka (@hvgoenka) December 12, 2023
काय म्हणाले होते नारायण मूर्ती ?
काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. तरुणांनी दिवसाचे 12 तास आणि आठवड्यातून सहा दिवस काम करावे, असेही ते म्हणाले होते. या विधानानंतर दोन गट पडले, काहींनी याचे समर्थन केले तर काहींनी विरोध केला.
सोशल मीडियावर ओरी चर्चेत
गेल्या काही महिन्यांपासून ओरी अवतारमणी खूप लोकप्रिय झाला आहे. तो जवळपास सर्व पार्टांमध्ये जातो आणि मोठ-मोठ्या सेलिब्रिटींसोबत फोटो काढतो. अलीकडेच त्याने बिग बॉस शोमध्ये सांगितले होते की, तो या फोटोंसाठी 20-30 लाख रुपये घेतो. त्याच्या या वक्तव्याने सलमान खानसह सर्वांनाच धक्का बसला होता.