बापरे! पठ्ठ्यानं स्टंटच्या नादात जाळून टाकली लाखोंची मर्सिडीज बेंज; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 07:03 PM2021-01-21T19:03:40+5:302021-01-21T19:14:18+5:30

कार चालकाने दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर खाली उतरत असताना अचानक कारने पेट घेतला.

National hugging day watch rare footage of two endangered golden monkeys hugging | बापरे! पठ्ठ्यानं स्टंटच्या नादात जाळून टाकली लाखोंची मर्सिडीज बेंज; पाहा व्हिडीओ

बापरे! पठ्ठ्यानं स्टंटच्या नादात जाळून टाकली लाखोंची मर्सिडीज बेंज; पाहा व्हिडीओ

Next

आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्टंट्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा लोकांना दुर्घटनेचाही सामना करावा लागतो. एका माणसानं आपली १ लाख डॉलरची मर्सिडीज कार गमावली आहे.  आता या कृत्यामुळे माणसाला कोर्टाच्या समोर हजर राहावं लागणार आहे. ही घटना रविवारी चेस्टर हिल्समध्ये घडली. जवळपास साडे बारा वाजेपर्यंत आापातकालीन सेवांना कॉल करून माहिती देण्यात आली की, मर्सिडीज बेंज एएमजीसी ६३ एसला आग लागली आहे. त्यानंतर अग्नीक्षमण दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले पण तोपर्यंत ही कार जळून खाक झाली होती. 

कार चालकाने दिलेल्या माहितीनसार रस्त्यावर खाली उतरत असताना अचानक कारने पेट घेतला. या दुर्घटनेदरम्यान कोणतीही जीवित हानी झालेली नाही.  या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून ते या घटनेचा अधिक तपास करत आहेत. सोशल मीडियावर हा फोटो  तुफान शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही जळत्या कारची दृश्य पाहू शकता. बाबो! 'या' व्यक्तीला आहेत २७ बायका अन् १५० मुलं-मुली; मुलगा सांगतोय या विशाल फॅमिलीचे किस्से...

या दृश्यांमधून दिसून येतं की जळत्या गाडीतून उडी मारण्यापूर्वी चालक जीव मुठीत घेऊन चालक गाडी चालवत होता. NSW पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कार १ लाख डॉलर्सपेक्षा अधिक महागडी होती.  एका लग्नसंमारंभासमोर  हा घातक प्रकार घडला होता. २५ वर्षीय ड्रायव्हर आणि कारच्या मालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांना कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. २८ वर्षीय तरूणाने उंची वाढण्यासाठी केला हा कारनामा, २ इंचासाठी आलेला खर्च वाचून व्हाल अवाक्...

Web Title: National hugging day watch rare footage of two endangered golden monkeys hugging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.