Navratri 2019 : यंदा नवरात्रीला कोणत्या दिवशी कोणता रंग?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 11:04 AM2019-09-28T11:04:03+5:302019-09-28T11:04:42+5:30
सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 29 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे.
सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. 29 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत ठिकठिकाणी दुर्गा मातेची मनोभावे पूजा करण्यात येणार आहे. या काळात ठिकठिकाणी अंबेमातेची प्रतिष्ठापना करून या आदिशक्तीचा जागर असतो.
नवरात्रीच्या उत्सवात नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्र परिधान करण्याची प्रथा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या नऊ दिवसांत वेगवेगळ्या रंगांची वस्त्र दुर्गा मातेलाही परिधान करण्यात येतात. असं म्हटलं जातं की, या रंगांच्या परंपरेमुळे सर्वांमध्ये एकोपा आणि समानतेचा संदेश देण्यात येतो.
यंदा नवरात्रोत्सव 2019 संपूर्ण भारतात धुमधडाक्टात साजरा करण्यात येणार आहे. जाणून घेऊया यंदाच्या नवरात्रोत्सवातील नऊ रंग...
- २९ सप्टेंबर २०१९ - भगवा
- ३० सप्टेंबर २०१९ - पांढरा
- १ ऑक्टोबर २०१९ - लाल
- २ ऑक्टोबर २०१९ - निळा
- ३ ऑक्टोबर २०१९ - पिवळा
- ४ ऑक्टोबर २०१९ - हिरवा
- ५ ऑक्टोबर २०१९ - राखाडी
- ६ ऑक्टोबर २०१९ - जांभळा
- ७ ऑक्टोबर २०१९ - मोरपंखी