Video: फॅशन डिजायनिंगच्या विद्यार्थ्यांचा PPE किट गरबा, गरबाप्रेमींनी लावली भन्नाट आयडिया
By manali.bagul | Published: October 17, 2020 01:24 PM2020-10-17T13:24:24+5:302020-10-17T13:37:31+5:30
Viral News Marathi : गरबाप्रेमींनी कोरोनाकाळातही गरबा खेळण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.
नवरात्रीचा सण गरबा नृत्याशिवाय अपूर्ण आहे. यंदा संपूर्ण जगभरात कोरोनाचं सावट असल्यामुळे लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासकरून गुजरातमध्ये नवरात्रीची मज्जा आणि उत्साह पाहण्यासारखा असतो. पण यावर्षी महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही दांडीया आणि गरबा खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान गरबाप्रेमींनी कोरोनाकाळातही गरबा खेळण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे.
#WATCH Gujarat: A group of students of fashion designing in Surat perform 'Garba' sporting hand-painted costumes made of PPE kits. These costumes have been designed by them. (15.10) pic.twitter.com/sKSYk7e3iy
— ANI (@ANI) October 16, 2020
कोरोनाकाळात गरब्याचा आनंद घेण्यासाठी सुरतच्या फॅशन डिजायनिंगच्या विद्यार्थ्यांनी पीपीई किटपासून तयार करण्यात आलेल्या खास पोशाखात गरबानृत्य केलं आहे. गरबा खेळण्यासाठी त्यांनी पांढऱ्या रंगाच्या पीपीई किटवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिजाईन्स केल्या आहे. याशिवाय रंगेबीरंगी ओढण्यांमुळे पीपीई कीटची शोभा आणखी वाढली आहे. पीपीई किट आकर्षीत दिसण्यासाठी कांचांचा वापरही करण्यात आला आहे. जिंकलंस पोरा! ८ वर्षाच्या चिमुरड्याने भरली १०० पेक्षा विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा फी
कोरोना व्हायरसमुळे गुजरात सरकारकडून नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
राज्य शासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, यंदा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. नियमावलीचे काटेकोर पालन करत देवस्थानांतर्फे अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. काही सार्वजनिक मंडळे ऑनलाईन लाईव्ह दर्शनाची सोय, तर काही मंडळे संकेतस्थळावर फोटो उपलब्ध करून देणार आहेत. नवरात्रोत्सवात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. APJ Abdul Kalam Birth Anniversary : ६ शर्ट , ४ पँट, १ घड्याळ अन् पुस्तकांचं वैभव इतकीच होती कलामांची संपत्ती!