जीडीपीची घसरण पाहून नेटिझन्स म्हणतात, #ModiHaiToMumkinHai

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 10:43 AM2020-09-02T10:43:18+5:302020-09-02T10:48:21+5:30

मोदी सरकारची टॅगलाईन वापरून मोदी सरकारवरच निशाणा

netizens mocks modi government with modi hai to mumkin hai after gdp contracts 23 9 percent | जीडीपीची घसरण पाहून नेटिझन्स म्हणतात, #ModiHaiToMumkinHai

जीडीपीची घसरण पाहून नेटिझन्स म्हणतात, #ModiHaiToMumkinHai

googlenewsNext

गेल्या अनेक महिन्यांपासून देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे समस्या आणखी वाढल्या आहेत. देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. ही घसरण ऐतिहासिक आहे. एप्रिल ते जून तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची अक्षरश: घसरगुंडी उडाली आहे. जगातील इतर कोणत्याही प्रमुख देशाची अर्थव्यवस्था भारताइतकी घसरलेली नाही.
 
घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरून विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसपासून सगळ्याच विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे यासाठी विरोधकांनी मोदी सरकारनं गेल्या लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या #ModiHaiToMumkinHai हॅशटॅगचा वापर केला आहे. अनेकांनी याच हॅशटॅगचा वापर करत ट्विट करून सरकारला लक्ष्य केलं आहे.





















Web Title: netizens mocks modi government with modi hai to mumkin hai after gdp contracts 23 9 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.