'जाने मेरी जाने मन...'; पाहा - 15 सेकेंदाच्या या VIDEO मध्ये रानू मंडलची धमाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 19:23 IST2021-10-18T19:23:29+5:302021-10-18T19:23:53+5:30
हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 5 लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे. लाल टी-शर्ट आणि स्कर्ट परिधान केलेल्या रानूने अत्यंत उत्साहाने 'बसपन का प्यार' गायले आहे.

'जाने मेरी जाने मन...'; पाहा - 15 सेकेंदाच्या या VIDEO मध्ये रानू मंडलची धमाल
एक गाणे गाऊन रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनलेल्या रानू मंडलचा (Ranu Mondal) आता 'बसपन का प्यार' गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यापूर्वी रानूचा हिट ट्रॅक 'माणिक मागे हिते' गातानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. (Ranu mondal sings bachpan ka pyaar)
YouTuber Rondhon Porichoy ने रानू मंडलची 'बसपन का प्यार' गातानाची एक 15 सेकंदाची क्लिप पोस्ट केली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 5 लाखहून अधिक लोकांनी बघितला आहे. लाल टी-शर्ट आणि स्कर्ट परिधान केलेल्या रानूने अत्यंत उत्साहाने 'बसपन का प्यार' गायले आहे.
'बसपन का प्यार' हे एक टॉप ट्रेंडिंग गाणं आहे. हे गाणं, या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. छत्तीसगडच्या सहदेव डर्डोने हे गायले होते. यानंतर रॅपर बादशाहने सहदेवच्या 'बसपन का प्यार' गाण्याचे रीमिक्स लॉन्च केल्यानंतर या गाण्याची लोकप्रियता वाढली.
अशी पॉप्युलर झाली होती रानू मंडल -
पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्थानकावर रानू मंडलचा लता मंगेशकर यांचे 'एक प्यार का नगमा है' हे लोकप्रिय गाणे गातानाचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, 2019 मध्ये रानू मंडल रातोरात इंटरनेट सेंसेशन बनली होती. यानंतर तिला मुंबईतील एका रिअॅलिटी शोमध्येही आमंत्रित करण्यात आले होते.
यानंतर, हिमेश रेशमियाने रानूला आपल्या हॅप्पी हार्डी अँड हीर चित्रपटासाठी गाण्याची विनंती केली होती. रानू मंडलने या चित्रपटासाठी हिमेश रेशमियासोबत आदत आणि आशिकी में तेरी 2.0 सारख्या गाण्यांना आवाज दिला आहे.