दोन तोंडाचा मासा इंटरनेटवर व्हायरल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 03:33 PM2019-08-22T15:33:56+5:302019-08-22T15:37:17+5:30
तुम्ही कधी दोन तोंडाचा मासा पाहिलाय का? नसेलच पाहिला... पण गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील मासा पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही.
न्यूयॉर्कमधील एक जोडपं मासे पकडण्यासाठी एका नदीवर गेलं होतं. त्यांनी मासे पकडण्यासाठी गळ टाकला आणि गळाला मासाही लागला. पण ज्यावेळी त्यांनी पकडलेला मासा पाण्यातून बाहेर काढला. त्यावेळचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली.
जोडप्याने जेव्हा गळाला लागलेला मासा पाण्यातून बाहेर काढला तेव्हा तो मासा पाहून दोघेही हैराण झाले. कारण जो मासा त्यांच्या गळाला लागला होता. त्या माशाला दोन तोंडं होती. NBC News ने दिलेल्या रिपोर्टनुसार, मासे पकडण्यासाठी नदीवर गेलेल्या महिलेचं नाव डेबी गेडेस असं होतं. जेव्हा त्यांनी मासा पाण्याबाहेर काढला तेव्हा ती हैराण झाली होती. कारण तिने पकडेला माशाला दोन तोंडं होती. त्यांनी हा मासा चॅम्प्लेन लेकमधून पकडला होता.
डेबी गेडेस यांनी सांगितलं की, 'जेव्हा आम्ही मासा पाण्याबाहेर काढला तेव्हा आम्हाला विश्वास नाही बसला की, आम्ही चक्क दोन तोंड असलेला साप पकडला आहे.' डेबीने सांगितलं की, 'आम्ही काही फोटो काढल्यानंतर पुन्हा माशाला नदीमध्ये सोडून दिलं.
नॉटी बायज फिशिंगने हे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. त्यांनी माशाचे फोटो त्यांच्या पेजवरून शेअर करत व्हायरल केले आहेत. नॉटी बॉयज यांनी सोमवारी हे फोटो अपलोड करत लिहिलं होतं की, 'आमची सहकारी डेबी गेडेस यांनी काही दिवसांआधी चॅम्प्लेन येथून दोन तोंडाच्या मासा पकडला होता.'
माशाचे फोटो आतापर्यंत 6 हजारपेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आले होते. या फोटोवर आतापर्यंत अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत.