हनीमूनला असताना झालं असं काही, पत्नी म्हणाली, "या व्यक्तीसोबत लग्न करून चूक केली..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 07:38 PM2022-04-06T19:38:57+5:302022-04-06T19:39:28+5:30
वाचा हनीमूनसाठी कंबोडियाला गेलेल्या कपलसोबत नक्की काय घडलं...
नवविवाहित जोडप्यासाठी हनीमून हा सर्वात सुंदर क्षणांपैकी एक असतो. परंतु जरा कल्पना करा, या दरम्यानही तुम्हाला ऑफिसमधून काही तातडीच्या कामाचं बोलावणं आलं तर कसे वाटेल? नक्कीच तुम्हाला एकतर काही सूचणार नाही किंवा राग येईल आणि तुमचा जोडीदारही नाराज होईल. लग्नानंतर हनीमूनसाठी कंबोडियाला गेलेल्या एका नवविवाहित जोडप्याबाबतही असंच घडलं.
अमेरिकेत राहणार्या एका व्यक्तीने Reddit वर सांगितलं की, या वर्षी जानेवारीमध्ये आपण हनीमूनसाठी कंबोडियाला गेला होता. इतक्यात ऑफिसमधून बॉसचा फोन आला आणि त्यांनी काही तातडीच्या कामासाठी एक दिवस ऑफिसला यायला सांगितलं. हे ऐकून त्याला संताप आला. कारण तो हनीमूनसाठी सुट्टी घेऊनच कंबोडियाला आला होता. त्यावेळी त्याच्या बॉसनंच त्याच्या सुट्ट्या मंजूर केल्या होत्या.
बॉसच्या बोलावण्यानंतरही त्यानं ऑफिसला येण्यास नकार दिल्यानं त्याला बेजबाबदार कर्मचारी कंपनीतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. त्याच्या Reddit पोस्टमध्ये, त्या व्यक्तीनं लिहिलं की, 'मी नुकतंच लग्न केलं आहे आणि आम्ही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी कंबोडियाला आलो. मला आणि माझ्या पत्नीला अनेकदा कामातून वेळ मिळत नाही, त्यामुळे या सुट्ट्या आमच्यासाठी खूप खास होत्या. मी १ जानेवारीला रजेसाठी अर्ज केला होता, दुसऱ्याच दिवशी बॉसनं तो अर्ज मंजूरही केला.
"मीटिंगमध्ये सहभागी होण्यास सांगतायत"
"आता माझे बॉस मला तिसऱ्याच दिवशी एका क्लायंटसोबत पिच मीटिंगमध्ये सहभागी होण्यास सांगत आहेत. ही डील खुप आवश्यक आहे आणि ते केवळ एकाच दिवसासाठी मला यायला सांगत आहेत. परंतु मी हनीमूनसाठी सुट्टीवर आलो असून मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही असं सांगितलं. परंतु त्यांनी मला केवळ एकाच दिवसासाठी येण्यास सांगितलं आहे," असंही त्यानं पुढे लिहिलंय.
या प्रकरणी आपल्या पत्नीशी चर्चा केल्यानंतर आता दोन निर्णयांमध्ये फसलो आहोत. जर गेलो नाही तर बॉस आपल्याला कामावरून काढेल, अन्यथा हनीमून रिप्लान करावा लागेल. दरम्यान, दुसरीकडे पत्नीनं आपण अशा व्यक्तीसोबत लग्न करून आपल्याला पश्चाताप होत असल्याचं म्हटलं. हा आपल्यासाठी एक कठीण काळ असल्याचंही त्यानं म्हटलं.