News Anchor Video: बापरे! टीव्ही अँकर LIVE शोमध्ये अचानक कोसळली, डोकं टेबलावर आपटलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 07:08 PM2023-03-19T19:08:57+5:302023-03-19T19:10:07+5:30
ती हळूहळू खाली सरकल्यासारखी वाटली, शरीराचा तोल गेला, अचानक डोळे बंद झाले.
News Anchor fall down, Video: टीव्हीवर लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना अँकर एलिसा कार्सन ऑन एअर बेशुद्ध पडल्याची घटना नुकतीच घडली. या भीषण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अँकर एलिसा कार्सन शेवोर्ट्ज शनिवारी सकाळी ७ वाजता हवामानाची माहिती देण्याच्या व्हिडिओमध्ये दिसत होती. बोलताना ती अचानक बेशुद्ध पडली आणि त्याच वेगाने जमिनीवर कोसळली. यानंतर त्याच्यासोबत कार्यक्रम करत असलेले दोन अँकर घाबरले आणि ही अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसली. या घटनेनंतर तिने ब्रेक घेतला. पण लाइव्ह दरम्यान अँकर पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
स्टुडिओमध्येच घडला प्रकार
एलिसा कार्सन अमेरिकेतील सीबीएस या वृत्तवाहिनीत तिच्या सहयोगी अँकरशी बोलत होती. हवामानाचा अहवाल देण्यापूर्वी एलिसाचे डोळे अचानक बंद होऊ लागले. तिला काहीतरी होतंय हे व्हिडीओ पाहून नक्कीच समजू शकते. तिच्यासोबत नक्की काय झाले हे नीट कळलं नाही. पण ती हळूहळू खाली सरकल्यासारखी वाटली, तिच्या शरीराचा तोल गेला, अचानक डोळे बंद झाले नि डोकं स्टुडिओमध्ये ठेवलेल्या बेंचवर आदळून ती खाली पडली. लाइव्ह टीव्हीवर तिच्यासोबत बसलेल्या दोन सहयोगी अँकरनी सुरुवातीला याकडे लक्ष दिले नाही. पण नंतर, एक अँकर निशेल मदिना हिने एलिसाने नाव घेत तिच्याबद्दल चिंता व्यक्त केल्याचे दिसले. पाहा Video:
Alissa Carlson collapsed by CBS ! 🚨The new normal !?🚨 pic.twitter.com/R3kLGoqGn6
— Sascha Gerecht (@GTSascha) March 19, 2023
लाईव्ह न्यूज शो दरम्यान ब्रेक घ्यावा लागला!
एलिसा खाली कोसळल्यानंतर अँकर किम म्हणाली, "आम्ही एलिसाला बघून येतो. तुम्हाला माहित आहे की आपण लगेचच भेटणारोत, परंतु आत्ता आम्ही विश्रांती घेतो." तथापि, ब्रेकनंतर, एक रेकॉर्डेड शो प्रसारित केला गेला.
एलिसाने फेसबुकवर दिली अपडेट
काही तासांनंतर, लाइव्ह शो दरम्यान बेशुद्ध झालेल्या एलिसाने फेसबुकवर तिची तब्येत सुधारत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे 2014 मध्ये एलिसा दुसऱ्या चॅनलमध्ये काम करत होती. त्यावेळीही लाइव्ह शोदरम्यान तिच्यासोबत अशीच एक घटना घडली होती. मात्र, ती बेशुद्ध होण्याचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.