Viral Video : आधार कार्ड असेल तरच लग्नात जेवण, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 08:22 AM2022-09-27T08:22:20+5:302022-09-27T08:23:07+5:30
नेटकऱ्यांकडून २१ तोफांची सलामी
अमरोहा : उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात एका विवाहसमारंभात अनोखा प्रकार घडला. लग्नानंतर आयोजित मेजवानीत वराकडून आलेल्या पाहुण्यांसाठी वधूकडील लोकांनी वेगळेच फर्मान काढले. आधार कार्ड असेल त्यांनाच जेवणाची परवानगी देण्यात आली. मात्र आधार कार्ड नसल्याने अनेक पाहुणे जेवण न करताच रागावून परतले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, २१ सप्टेंबर रोजी हसनपूर येथील एका वस्तीत दोन लग्नांचे आयोजन होते. त्यामुळे लग्नाच्या दोन वराती परिसरात आल्या होत्या. एका लग्नात जेवणाचा कार्यक्रम लवकर सुरू झाला. दुसऱ्या लग्नासाठी आलेले काही पाहुणेही त्याच मेजवानीत सामील झाले आणि जेवणावर तुटून पडले. पाहुण्यांची इतकी जास्त संख्या पाहून नवरीकडील लोक चिंताग्रस्त झाले, थोड्याच वेळात जेवण बंद केले.
In a seemingly bizarre incident, guests at a #wedding in Uttar Pradesh's #Amroha district were asked to show their #Aadhaar cards before they were allowed to pick up dinner plates.
— IANS (@ians_india) September 25, 2022
The incident took place in Hasanpur where two sisters were getting married at the same venue. pic.twitter.com/9IfenucXUH
सर्व पाहुण्यांना मंडपाच्या बाहेर काढण्यात आले. मग आधार कार्ड असलेल्यांनाच प्रवेश मिळेल अशी अट ठेवण्यात आली. मात्र, या अटीमुळे लग्नातील खरे पाहुणेही ओळखीचा पुरावा नसल्यामुळे अडचणीत आले होते. त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती; पण काही समजूतदार लोकांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केले आणि अखेर परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात यश आले.
नेटकऱ्यांकडून २१ तोफांची सलामी!
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. नेटकरीही भारताच्या इतिहासातील अशी पहिली लग्नाची वरात असेल... वाह-वाह हसनपूरवासीयांच्या अशा आदरातिथ्याबद्दल २१ तोफांची सलामी अशा अतिशय मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.