"आपलं काम करा, पगार घ्या अन् थेट घरी जा..."; IAS Officer ची 'ही' पोस्ट तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 12:57 PM2022-11-16T12:57:37+5:302022-11-16T13:14:40+5:30
IAS Officer Awanish Sharan : आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
भारतातील लाखो लोक रोज ऑफिसमध्ये जातात. दिवसभरातील सर्वात जास्त वेळ ते तिथेच घालवतात. याच दरम्यान ऑफिसमधील काही सहकारी हे चांगले मित्र होतात. तर काहींशी फक्त कामापुरतच बोललं जातं. काही लोकांचा ऑफिसमधला अनुभव वाईट असल्याने ते एकटंच राहणं पसंत करतात. अशातच आता सोशल मीडियावर एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
आयएएस अधिकारी अवनीश शरण (IAS Officer Awanish Sharan) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर त्यांनी यावरून नेटकऱ्यांना तुम्ही सहमत आहात की नाही? असा प्रश्न देखील विचारला आहे. ‘Not Everyone At Your Workplace Is Your Friend… DO Your Job, Get Paid…Go Home… म्हणजेच ऑफिसमधील प्रत्येकजण हा तुमचा मित्र नसतो. फक्त आपलं काम करा. पगार घ्या आणि घरी जा…" असं म्हटलं आहे.
Agree or Not ? pic.twitter.com/VjOVJJB0i2
— Awanish Sharan (@AwanishSharan) November 15, 2022
अवनीश शरण यांचं हे ट्विट काही तासातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं. अनेकांनी या वाक्याला सहमती दर्शवली आहे. काही लोकांनी ही गोष्ट सत्य असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने मात्र या गोष्टीला विरोध केला आहे. या वाक्याशी मी सहमत नाही. कारण ऑफिस हे आपलं दुसरं घर असं म्हटलं आहे.
एका युजरने नोकरीच्या सुरुवातीच्या वर्षांत माझे काही मित्र झाले होते. पण गेल्या 18 वर्षात ऑफिसमध्ये माझा कुणीही मित्र झाला नाही असं सांगितलं आहे. आणखी एका युजरने या वाक्याशी मी सहमत आहे. कारण सहकाऱ्यांमध्ये प्रेम, सहकार्य आणि मैत्रीची भावना होते. पण परिस्थितीनुसार स्पर्धा, इर्श्या, उपहास, निंदा, चुगल्या आदी गोष्टी जोडल्या जातात असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"