कडक भावा; बकरीला वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी, जपली माणुसकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 06:05 PM2020-06-27T18:05:38+5:302020-06-27T18:06:39+5:30
30 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय हा थरकाप उडवणारा Video
केरळमध्ये गर्भवती हत्तीणीच्या हत्येनंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर मुक्या प्राण्यांच्या हत्येच्या अनेक घटना समोर आल्या. त्यावरून एकुणच माणुसकी हरवल्याचे चित्र समोर येत होते. आसाममध्ये बिबट्याची हत्या, हिमाचल प्रदेशमध्ये गायीला ज्वलंत फटाके खायला देणे, औरंगाबाद येथे कुत्र्याला बाईकच्या मागे बांधून फरफटत नेणे, अशा प्रकारानं संताप व्यक्त होत होता. पण, अजूनही माणुसकी शिल्लक आहे, हे सांगणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
Video : शेतात काम करताना दिसला महेंद्रसिंग धोनी; चाहते म्हणाले, वाघ आता म्हातारा झाला!
एका बकरीला वाचवण्यासाठी काही युवकांची धडपड व्हिडीओत पाहायला मिळते. त्या बकरीसाठी एक युवक स्वतःच्या जीवाची बाजी लावताना दिसत आहे. दक्षिण भारतातील हे ठिकाण असावे. त्यांच्या बोली भाषेतून किमान तसा अंदाज बांधता येत आहे. एका बोरवेल किंवा तत्सम खड्ड्यात बकरी पडली आहे. तिला वाचवण्यासाठी चार युवक एकत्र आले असून एक युवक चक्क डोक्याच्या दिशेनं त्या खड्ड्यात गेला. अन्य दोन युवकांनी त्याचे दोन्ही पाय धरलेले आहेत. पाच-सहा फुटांचा हा खड्डा असावा.
हा युवक पूर्णपणे आत गेला आणि त्यानंतर त्यानं बकरीला खेचून बाहेर काढले. बकरीला जीवदान देण्यासाठी आपल्या आयुष्याची बाजी लावणाऱ्या या युवकाचं कौतुक होत आहे.
पाहा व्हिडीओ...
When there is will there is way.
— Maheep Sharma (@MaheepSharma5) June 26, 2020
Gratitude 🙏@ParveenKaswan@SudhaRamenIFS@susantananda3
Courtesy – Hard Patel, LinkedIn. pic.twitter.com/KvvUqOLRar
अन्य महत्त्वाच्या बातम्या
हा माझा भारत नाही; 'त्या' घटनेनं आनंद महिंद्रा यांना केलं व्यथित!
अजिंक्य रहाणेकडून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला...
1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळायचे इतके मानधन; Viral Photo पाहून विश्वास बसणार नाही
Video Viral : शोएब मलिक पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत करत होता फ्लर्ट; सानिया मिर्झा म्हणाली...
प्यार वाली Love Story: रॉबिन उथप्पाला दोन वेळा करावं लागलं होतं लग्न!
पीसीबीचा सावळागोंधळ; आधी पॉझिटिव्ह असलेल्या 10 पैकी 6 खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह!