साऊथ इंडियनसाठी नाही Nothing चा स्मार्टफोन?; ट्विटरमध्ये #DearNothing ट्रेंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 01:32 PM2022-07-13T13:32:18+5:302022-07-13T13:36:31+5:30

भारतातील दुसऱ्या टेक यूट्यूबरला हा मोबाईल रिव्ह्यू करण्यास पाठवले. म्हणून प्रसाद नावाच्या युट्यूबरने याबाबत व्हिडिओ बनवत कंपनीवर व्यंगात्मक टीका केली आहे.

Nothing smartphone for South Indians ?; #DearNothing trending on Twitter | साऊथ इंडियनसाठी नाही Nothing चा स्मार्टफोन?; ट्विटरमध्ये #DearNothing ट्रेंडिंग

साऊथ इंडियनसाठी नाही Nothing चा स्मार्टफोन?; ट्विटरमध्ये #DearNothing ट्रेंडिंग

Next

नवी दिल्ली - Nothing नं त्यांचा पहिला स्मार्टफोन Phone(1) भारतात लॉन्च केला आहे. या मोबाईलमध्ये रियर डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे. प्राइमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. या फोनच्या फिचर्सबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. परंतु लॉन्चनंतर काही तासांतच ट्विटरवर 'Dear Nothing' असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. 

या फोनबाबत इतकी चर्चा सुरू आहे की, भारतात सध्या १ नंबरवर हा ट्रेंड सुरू आहे. परंतु ही चर्चा सकारात्मक नाही. साऊथ इंडियन अभिनेत्रीसोबत भेदभाव केल्याचा आरोप कंपनीवर लावण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया. 

रिपोर्टनुसार, एका साऊथ इंडियन युट्यूबरने हा हॅशटॅग सुरू केला. युट्युबरचा दावा आहे की, लंडन बेस्ड मोबाईल कंपनी Nothing ने त्यांचा पहिला स्मार्टफोन एका साऊथ इंडियन यूट्यूबर्सला रिव्ह्यू करण्यासाठी पाठवला होता. त्यानंतर ट्विटरवर युजर्सने Nothing कंपनीवर भेदभाव केल्याचा आरोप करत Dear Nothing असा हॅशटॅग सुरू केला. अनेक युजर्सने कंपनीच्या या प्रकारावर नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. Nothing नं भारतातील लोकांसोबत भेदभाव केल्याचा आरोप कंपनीवर लावण्यात येत आहे. 

तर भारतातील दुसऱ्या टेक यूट्यूबरला हा मोबाईल रिव्ह्यू करण्यास पाठवले. म्हणून प्रसाद नावाच्या युट्यूबरने याबाबत व्हिडिओ बनवत कंपनीवर व्यंगात्मक टीका केली आहे. सध्या या हॅशटॅगवर हजारो युजर्स ट्विट करत आहेत. ट्विटरवर हॅशटॅग नंबर १ ला आहे. साऊथ इंडियामध्ये ५ राज्य आहेत त्यांच्याशी भेदभाव कंपनी करायला नको होतो असं लोकांचे म्हणणं आहे. कंपनीने या फोनला तीन कॉन्फ्रिग्रेशनमध्ये लॉन्च केले आहे. हँडसेट ८ जीबी, १२८ जीबी, २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम हे फिचर्स दिले आहेत. 

Nothing कडून प्रतिक्रिया नाही
अद्याप या घटनेवर अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया कंपनीकडून आलेली नाही. याबाबत कंपनीला विचारणा करण्यात आली. मोठ्या प्रमाणात युजर्सला अजूनही माहिती नाही की नेमकं भेदभाव केला आहे की हा प्रॅंक व्हिडिओ आहे. 
 

Web Title: Nothing smartphone for South Indians ?; #DearNothing trending on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.