हर्ष गोएंकांनी ट्वीट केला हवेत उडणाऱ्या डोश्याचा व्हिडिओ, हे कर्तब करणाऱ्याचं सर्वत्र भारी कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:16 PM2022-04-26T12:16:17+5:302022-04-26T12:33:08+5:30

उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही (Harsh goenka) या डोसेवाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि याचं कारण ते म्हणजे त्याची डोसा बनवण्याची युनिक स्टाईल.

Now, the ‘flying dosa’ man has left Harsh Goenka amazed. Watch him in action | हर्ष गोएंकांनी ट्वीट केला हवेत उडणाऱ्या डोश्याचा व्हिडिओ, हे कर्तब करणाऱ्याचं सर्वत्र भारी कौतुक

हर्ष गोएंकांनी ट्वीट केला हवेत उडणाऱ्या डोश्याचा व्हिडिओ, हे कर्तब करणाऱ्याचं सर्वत्र भारी कौतुक

googlenewsNext

गेले काही दिवस सोशल मीडियावर रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांनी धूमाकूळ घातला आहे. कच्चा बादाम, कच्चा अमरूद, काला अंगूर, लालमलाल टरबूज अशा बऱ्याच विक्रेत्यांनी नेटिझन्सचं लक्ष वेधलं. आता एका डोसेवाल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही (Harsh goenka) या डोसेवाल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि याचं कारण ते म्हणजे त्याची डोसा बनवण्याची युनिक स्टाईल.

रस्त्यावर मिळणाऱ्या विविध पदार्थांची चव तर आपल्या लक्षात राहतेच, मात्र हे पदार्थ विकणारे काही व्यापारी हे त्यांच्या हटके स्टाईलमुळंही लक्ष वेधून घेतात (Unique Style of making and Serving Dosa). त्यापैकीच आहे हा डोसेवाला. हातातील मोठ्या उलथण्याने डोसे कट करणारा, त्याचाच वापर करत त्याची घडी करणारा आणि घडी केलेल्या डोशाचे पुन्हा त्याच उलथण्याचा वापर करून तुकडे करणारा डोसेवाला डोळ्याची पापणी लवायच्या आत त्याचं काम पूर्ण करतो (Viral Dosa Vendor Video). एखाद्या रोबोच्या वेगानं रस्त्यावर डोसे बनवणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे (Viral Dosa Vendor on Social Media).

व्हिडीओत पाहू शकता डोसा विक्रेता एकाच वेळी तव्यावर बरेच डोसे टाकतो. त्यावर आवश्यक ते मसाले आणि बटर टाकून कापून वेगळे करतो. त्यानंतर त्याची घडी करून तो आपल्या सहकाऱ्याच्या दिशेने भिरकावतो. डोसा हवेत उडत बरोबर त्या व्यक्तीच्या हातातील ताटात जाऊन पडतो. ती व्यक्तीही आरामात डोसा ताटात कॅच करते आणि ग्राहकांना सर्व्ह करते.

डोसावाल्याचा हा स्टंट पाहून तिथं असलेले ग्राहकही थक्क झाले आहेत. व्हिडीओचा आवाज ऐकला तर तेही क्या बात है असं बोलताना दिसतात. वेगानं डोसे तयार करणारा व्यापारी आणि त्याने भिरकावलेली प्लेट अलगद झेलून घेणारा त्याचा सहकारी यांचं कसब पाहून प्रत्येकालाच आश्चर्य वाटतं. त्याचा सहकारीदेखील कौतुकास पात्र असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे.

हर्ष गोयंकाही हा व्हिडीओ पाहून इम्प्रेस झाले आहेत. तुम्ही जे काही करता, त्यावर तुम्ही प्रेम करायला हवं, असं कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिलं आहे. याआधी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी या डोसेवाल्याची तुलना रोबोशी केली होती.

Web Title: Now, the ‘flying dosa’ man has left Harsh Goenka amazed. Watch him in action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.