जबरदस्त! भारतातील दुर्मिळ काळ्या रंगाचा वाघ कॅमेरात कैद; पाहा व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 07:28 PM2020-11-05T19:28:36+5:302020-11-05T19:38:31+5:30
Viral News Marathi : या प्रजातीचे वाघ ओडिसामध्ये दिसून येतात. दिवसेंदिवस या वाघांची संख्या कमी होत आहे.
एका हौशी फोटोग्राफरने दुर्मिळ काळ्या पट्ट्याच्या वाघाचा फोटो कॅमेरात कैद केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. फोटोग्राफर सौमेन बायपेयी मागच्या वर्षी नंदनकावन अभयारण्यात गेले होते. तेव्हा त्यांना मेलानिस्टिक वाघ (Melanistic Tiger) दिसला. वाघांची ही प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मेलानिस्टिक ही वाघाची दुर्मिळ प्रजात आहे. या प्रजातीचे वाघ ओडिसामध्ये दिसून येतात. दिवसेंदिवस या वाघांची संख्या कमी होत आहे. थोड्याफार प्रमाणात वाघ अस्तित्वात आहेत.
मुळचे पश्चिम बंगालच्या पंसकुरा येथिल रहिवासी असलेले सौमेन बायपेयी मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये नंदनकावनमध्ये पक्षी निरिक्षण करत होते. सुरूवातीला त्यांना वाघाला पाहिल्याचे जाणवले. एनडीटीव्हीशी बोलताना सौमेन यांनी सांगितले की, '' मी झाडाझुडूपांमध्ये पक्षी आणि माकडांचे निरिक्षण करत होतो. तेव्हा अचानक समोर वाघासारखे काहीतरी दिसले. पण तो सामान्य वाघ नव्हता. त्यावेळी मला मेलेनिस्टीक या वाघांच्या प्रजातींबद्दल काहीही कल्पना नव्हती. काही सेंकद थांबून वाघ पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला. आतापर्यत मी अनेक वाघ पाहिले पण असा वाघ पाहिला नव्हता. '' Video : पाकमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली मेट्रो; पब्लिकची प्रवासाची स्टाईल पाहून पोट धरून हसाल
या दरम्यान वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सौमेन यांनी आपल्या कॅमेरात वाघाचे फोटो कैद केले. वाघांबद्दल सांगताना सौमेन म्हणाले की, १९९३ मध्ये त्यानंतर २००७ मध्ये ओडिशाच्या सिमलीपाल टायगर रिझर्व्हमध्ये मेलिस्टिक वाघांची उपस्थिती नोंदवली गेली. त्यानंतर, काही वर्षांनंतर, नंदकन अभयारण्यात एका वाघाने चार छाव्यांना जन्म दिला. त्यातील दोन मेलेनिस्टीक होते. ते दोन मेलेनिस्टीक वाघ त्वरित लक्षात आले आणि त्यांच्या वाढीची सीसीटीव्हीद्वारे देखरेख केली गेली. एक वर्षानंतर, त्याला मोकळ्या वातावरणात आणले गेले. बाबो! 'अँटीव्हायरस टिफिन' खाण्यासाठी लोक करताहेत गर्दी, वाचा 'या' भन्नाट हॉटेलची खासियत