कारला लागली भीषण आग अन् कपल गाडीतच जळणार होतं, शेवटच्या क्षणी झालं असं की....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 15:51 IST2021-09-12T15:49:43+5:302021-09-12T15:51:31+5:30
एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका गाडीला आग लागल्याचे दिसत आहे. यात एक वृद्ध कपल अडकले आहे. या दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ पाहुन तुम्ही पुढे काय झालं याची कल्पनाच करु शकत नाही.

कारला लागली भीषण आग अन् कपल गाडीतच जळणार होतं, शेवटच्या क्षणी झालं असं की....
सोशल मिडियावर दुर्घटनेचे व्हिडिओ चटकन व्हायरल होतात. अश्याच एका व्हायरल व्हिडिओमध्ये एका गाडीला आग लागल्याचे दिसत आहे. यात एक वृद्ध कपल अडकले असून या दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहुन तुम्ही पुढे काय झालं याची कल्पनाच करु शकत नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यावरून जात असताना कपलच्या कारला भीषण आग लागली. कार आगीत जळत असताना आतमध्ये कपल अडकलं. गाडीच्या मागे खूप मोठी आग लागली आहे. आग वेगानं पसरत आहे. त्याचवेळी आजूबाजूला जाणाऱ्या गाड्यांमधील लोकांनी खाली उतरून या दुर्घटनाग्रस्त गाडीतील कपलचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अखेरीस शर्थीचे प्रयत्न करून घटनास्थळावरील लोकांनी वृद्ध कपलला रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवला. त्यांनंतर आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली.
कॅलिफोर्नियातील या घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ लेकसाइड फायर डिस्ट्रिक्टने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ७ सप्टेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.