Funny Video: लग्नात जेवण केल्यावर या व्यक्तीने केलं असं काही, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 04:15 PM2022-05-04T16:15:40+5:302022-05-04T16:17:16+5:30

Viral Video : हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल. कारण यात एका व्यक्तीने जेवण झाल्यावर जे केलं त्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.

Old man doing something strange during party funny video goes viral | Funny Video: लग्नात जेवण केल्यावर या व्यक्तीने केलं असं काही, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल

Funny Video: लग्नात जेवण केल्यावर या व्यक्तीने केलं असं काही, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल

googlenewsNext

Viral Video : सोशल मीडियावर नेहमीच काही मजेदार तर काही विचित्र व्हिडीओ बघायला मिळतात. कधी हसवणारे तर कधी हैराण करणारे व्हिडीओ बघायला मिळतात. काही काही तर असे व्हिडीओ असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. असाच एक  हैराण करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही हैराणही व्हाल. कारण यात एका व्यक्तीने जेवण झाल्यावर जे केलं त्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल.

नेहमीच पार्टी किंवा एखाद्या लग्न समारंभात लोक अजब वागतात. त्यांचं हे वागणं पाहून अवाक् व्हायला होतं. असंच काहीसं या व्यक्तीने केलं. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका लग्नात लोक जेवण करत आहे. ही व्यक्तीही जेवणाचा आनंद घेत आहेत. त्याच्या आजूबाजूला काही लहान मुलेही आहेत. ही व्यक्ती जेवण झाल्यावर समोर असलेली एक चपाती घेतो आणि त्याने आपलं तोंड पुसतो. हे बघून तुम्हीच काय कुणीही हैराण होईल. 

या व्यक्तीने जे केलं त्यावर लोकांना विश्वासही बसत नाहीये आणि ते हैराण झाले आहेत. या व्यक्तीच्या समोरच बसलेल्या एका व्यक्तीने हा कारनामा रेकॉर्ड केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झााल आहे. लोक हा व्हिडीओ पाहून पोट धरून लोटपोट होऊन हसत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर 'sensen4947' नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाोकांनी पाहिलंय. तसेच लोक अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत.

Web Title: Old man doing something strange during party funny video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.